Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कोल्हापुरात शुभारंभ! राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू होणार

राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापुरात पार पडला. या योजनेची राज्यातील सर्व जिल्ह्यात अमंलबजाणी केली जाणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 10, 2024 | 09:54 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना शासनाकडून राबविण्यात येत असून त्या अंतर्गत  योजनेची रक्कम महिलांच्या खात्यात थेट जमा होत आहे. त्याचबरोबर राज्यशासनाची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गारगोटी, कोल्हापूरमधून येथे करण्यात आला.

या योजने अंतर्गत पात्र असलेल्या जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांना एक वेळ एक रकमी ३०००/- रुपयांच्या मर्यादित अनुदान दिले जाणार आहे. राज्यात आजपर्यंत या योजनेकरिता  तब्बल १७ लाख २३ हजार ३०  इतके अर्ज प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यामधील पात्र असलेल्या  ४० हजार २२० जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यावर डीबीटीद्वारे निधी वर्ग करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ झाल्याचे गारगोटी येथे जाहीर केले.

हे देखील वाचा-राज्य मंत्रिमंडळ्याच्या बैठकीत घेण्यात आले तब्बल 80 निर्णय! अनेक महामंडळांना दिली मान्यता

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू होणार

या एकवेळ एकरकमी 3000 रुपयांच्या अनुदानातून ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक असलेले सहाय्य उपकरणे खरेदी करावे तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादी शिबिरामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोल्हापुर जिल्ह्यातून सुरू झालेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेची आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू होत आहे. योजनेचा शुभारंभ प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कोल्हापूरातील  नामदेव गोपाळ भोसले आणि कांचन अप्पासो रेडेकर यांना योजनेचा तीन हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी आमदार प्रकाश अबीटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, उपविभागीय अधिकारी हरेश सूळ, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सचिन साळे आदी उपस्थितीत होते.

हे देखील वाचा-रतन टाटा अनंतात विलीन, शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसस्कार

मुख्यमंत्री वयोश्री योजना

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानामुळे येणारे  दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजनेकरिता, तेसेच आवश्यक सहाय्य उपकरणे, मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यामध्ये शासनातर्फे मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.

 

Web Title: Chief minister eknath shinde launched the mukhyamantri vyoshree yojana in kolhapur implementation will start in all districts of the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 09:52 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Senior Citizen

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
3

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.