फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पुढील आठवड्यामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज महायुतीच्या मंत्रीमंडळाची शेवटची बैठक असू शकते. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाकडून रेकॉर्डब्रेक असे 80 निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारने काही नवी महामंडळे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उद्योगपती रतन टाटा यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या बैठकीमध्ये जवळपास 80 निर्णय झाल्याची माहिती दिली. महामंडळ, पत्रकारांसाठी आणि वृत्तपत्रे विक्रेते यांच्यासाठी दोन स्वतंत्र्य महामंडळासही कॅबिनेटमध्ये मान्यता दिली. गोरा कुंभार, कोळी समाज महामंडळाचा प्रस्ताव मागवला आहे. तसेच नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट उत्पादनाची मर्यादा 8 लाखावरुन वाढवून आता 15 लाखांची करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त