खारघर सेक्टर 36 येथे सिडको तर्फे अल्प उत्पन्न धारक आणि अत्यल्पउत्पन्न धारकांसाठी “स्वप्न पूर्ती “या नावाने 58 इमारतींचे बांधकाम केले आहे.2014 साली बांधून पूर्ण झालेल्या या रहिवाशी संस्थेतीचे हस्तातरणं संस्थेतील सदनिका धरकांकडे अद्याप झालेले नसल्याने इमारती मधिल लिफ्ट तसेच परिसरातील विजेच देयक भरण्याची जवाबदारी अद्याप सिडको प्रशासनाकडे आहे. मात्र मागील दोन महिन्यापासून सिडको प्रशासनाने वीज देयका पोटी आलेले 17 लाखाचे देयक माहावितरण विभागाकडे केलेलं नसल्याने महावितरण विभागाने बुधवारी ( ता.28)कारवाई करत राहिवाशी संस्थेचा वीज पुरवठा खंडित केला असल्याची माहिती महावितरण विभागाचे अधिकारी शकील अहमद यांनी दिली आहे
. सिडको कडे वारंवार पाठपुरावा करून देखील सिडको प्रशासनाने वीज देयक भरण्यास टाळा टाळ केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे महावितरण विभागाकडून सांगण्यात आले. महत्वाचे म्हणजे स्वप्न पूर्ती रहिवाशी संस्थेत 14 मजल्याच्या 36 तर 7 मजल्याच्या 22 इमारती मध्ये पावणे चार हजारा पेक्षा जास्त सदनिका आहेत.महावितरण विभागाकडून अचानक करण्यात आलेल्या कारवाई मुळे वरच्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांची मोठी अडचण झाली असून, घरा मध्ये आजारी रुग्ण असलेल्या रहिवाशांनी खाली उतरायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अचानक खंडित करण्यात आलेल्या विजपुरवठ्याचा परिणाम पाणी पूरवठ्यावर होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे