Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिव जलसंधारणातील भ्रष्टाचार प्रकरण आमदार धस केंव्हा धसास लावणार? नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

आमदार धस जलसंधारणाचे भ्रष्ट्राचार प्रकरण धसास केंव्हा लावणार असा प्रश्न लोकांतून उपस्थित केला जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2025 | 04:20 PM
धाराशिव जलसंधारणातील भ्रष्टाचार प्रकरण आमदार धस केंव्हा धसास लावणार? नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

धाराशिव जलसंधारणातील भ्रष्टाचार प्रकरण आमदार धस केंव्हा धसास लावणार? नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:
  • जलसंधारण विभागात कोट्यावधींचा भ्रष्टाचार
  • भाजपा आमदार सुरेश धस यांची तक्रार
  • भ्रष्टाचार प्रकरण धस केंव्हा धसास लावणार?
धाराशिव/शीतलकुमार शिंदे : धाराशिवच्या जलसंधारण विभागातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराची तक्रार सत्ताधारी भाजपा आमदार सुरेश धस यांनी जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे करूनही अद्याप यावर कारवाई झाली नसल्याचे दिसून येते आहे. कांही काळापूर्वी धाराशिव नगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरण धसास लावणारे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास वेळ का लागत आहे. मग आमदार धस जलसंधारणाचे भ्रष्ट्राचार प्रकरण धसास केंव्हा लावणार असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

तब्बल दीडशे कामांसाठी राज्य शासनाने चालू वर्षीच्या फेब्रुवारी २०२५ ला दोन आणि ३० मार्च २०२५ ला एक असे तीन शासन निर्णय काढून कोट्यावधींचा निधी धाराशिव जिल्हा जलसंधारण विभागाला दिला आहे. यापैकी २० फेब्रुवारीच्या दोन शासन निर्णयातून ५२ कामांना आणि मार्चच्या शासन निर्णयातून ९८ कामांचा निधी वितरण करण्यास मान्यता दिलेली आहे.

२० फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या शासन निर्णयानुसार ५२ कामापैकी २७ कामातून ९२८ शेतकऱ्यांच्या शेतातील १२ लाख ४९ हजार ६२ घनमीटर गाळ कागदोपत्री काढण्यात आला आहे. यापैकी अनुदानास पात्र शेतकऱ्यांच्या शेतात टाकलेला गाळ ८ लाख २३ हजार १८५ घनमीटर आहे. त्यांना २ कोटी ९४ लाख २८ हजार ८९९ इतकी रक्कम अनुदानापोटी देण्यात आल्याचे भरविण्यात आले आहे. तर कंत्राटदार संस्थांना ४ कोटी ६० लाख ७७ हजार ८९७ इतकी रक्कम वाटप करण्यात आली आहे. अशी एकूण ७ कोटी ५५ लाख ६ हजार ७९७ इतकी रक्कम वाटप केली आहे.

याच तरखेतील दुसऱ्या शासन निर्णयानुसार २५ जलसाठ्यातील १४ लाख ५९ हजार ५४७.६८ घनमीटर गाळ काढण्यात आला. यापैकी ७ लाख ३६ हजार ९८२.३६ घनमीटर गाळ अनुदानास पात्र असून, अनुदानास लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ८९२ इतकी दर्शविण्यात आली आहे. शेतात पासरविलेल्या गाळाची रक्कम २ कोटी ६३ लाख ४७ हजार ११९ इतकी असून संस्थांना अदा करण्यात आलेली रक्कम ५ कोटी ८४ लाख २ हजार ७१३.९९ इतकी आहे. अशी एकूण ८ कोटी १ लाख ८९ हजार ८३३ इतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे.

३० मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ९८ जलसाठ्यातील गाळ काढण्यात आला असून, शेतकऱ्यांना ९ कोटी पाच लाख तर अशासकीय संस्थांना १५ कोटी ६७ लाख असे एकूण २४ कोटी ७२ लाख इतका निधी शासनाने मंजूर केलेला आहे. अशी तब्बल ४० कोटींच्या निधीची १५० कामे कागदोपत्री केल्याचे दाखवून येथील प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्याने मोठा भ्रष्टाचार करून स्वतःचे उखळ पांढरे केल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

जलासाठ्यातील गाळ उपसण्यासह अन्य बांधबंधारे दुरुस्ती, निर्मिती, खोलीकरण, सरळीकरण आदी प्रकारच्या कामात कागदोपत्री खर्च दाखवत शासनाच्या अर्थात जनतेच्या शेकडो कोटींच्या निधीवर हात साफ करण्यात आला असून, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषी अधिकाऱ्यावर पोलिसांत गुन्हे नोंद होऊन शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

दरम्यान सध्या नागपूर हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे. अन्यथा या लोकप्रतिनिधींसह संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या इशारा जिल्ह्यातील अनेक पक्ष संघटनांनी दिला असून, दुष्काळी धाराशिव जिल्ह्याला न्याय देण्याची मागणी जनतेतून होत आहे.

Web Title: Citizens have become aggressive over the corruption case in dharashiv water conservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 04:20 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Dharashiv News
  • Suresh Dhas

संबंधित बातम्या

CM Devedra Fadnavis : शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्या :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

CM Devedra Fadnavis : शहरातील विकासकामे पूर्ण करताना उपयुक्ततेवर भर द्या :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडलं? गृहमंत्रालयाने खुलासा करावा; सपकाळांची मागणी
2

सावरी गावात मुंबई क्राइम ब्रांचला काय सापडलं? गृहमंत्रालयाने खुलासा करावा; सपकाळांची मागणी

लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवीन नियम तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी
3

लिफ्ट अपघात रोखण्यासाठी नवीन नियम तातडीने लागू करा; आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

अपक्ष उमेदवाराचा आरपीआयचा उमेदवार म्हणून प्रचार; नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार
4

अपक्ष उमेदवाराचा आरपीआयचा उमेदवार म्हणून प्रचार; नेते निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.