Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतल्याचे पाहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2025 | 03:24 PM
Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

Flood Relief: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला! शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; तब्बल ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर

Follow Us
Close
Follow Us:

राज्यात अतिवृष्टीने मोठे नुकसान 
हजारो हेक्टर जमिनीचे नुकसान 
राज्य सरकारने जाहीर केली मदत

Devendra Fadnavis: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतला. हजारो हेक्टर जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान राज्य सरकारने २२०० कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत ही मदत जाहीर केली.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बुजलेल्या विहींरींसाठी ३० हजार रुपये दिले जाणार आहे. शेतकऱ्यांचे पिकांवर मुलाप्रमाणे प्रेम असते. शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. दिवाळीआधी मदत देण्याचा प्रयत्न असणार आहे. अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.”

LIVE | पत्रकार परिषद 🕝 दु. २.२७ वा. | ७-१०-२०२५📍मुंबई.#Maharashtra #Mumbai #PressConference https://t.co/0CnzxhXHRV — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 7, 2025

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी  ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. २९  जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे उभारली जाणार आहेत. बागायती शेतकऱ्यांना ३२ हजार ५०० रुपये प्रती हेक्टरी मदत केली जाणार आहे.

पॅकेजमध्ये नेमके काय?

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. ज्या शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीमध्ये वाहून गेली आहे त्यांना ३.४७ लाख रुपयांची मदत हेक्टरी केले जाणार आहे. जमीन खरडून गेलेय शेतकऱ्यांना ४७ हजार रोख नुकसान भरपाई आणि हेक्टरी ३ लाख नरेगाच्या माध्यमातून दिली जाणार आहे.

जनावरांना ३७ हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. गाळ भरलेल्या विहिरींसाठी ३० हजार रुपये देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी केली अजणार आहे. ज्या शेतकऱ्यांची घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत उभी केली जाणार आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांना ३५ हजारांची मदत केली जाणार आहे. बागायती शेतीमध्ये ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना ५० हजरांपेक्षा जास्त मदत मिळणार आहे.  विम्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना १७ हजार रुपये हेक्टरी मदत केली जाणार आहे.

Web Title: Cm devendra fadnavis dcm shinde and pawar declared 31 thousand crores package for flood affected farmers in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Farmers
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘या’ मंत्र्याने दिला वर्षभराचा पगार; जाणून घ्या रक्कम किती?
1

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘या’ मंत्र्याने दिला वर्षभराचा पगार; जाणून घ्या रक्कम किती?

Maratha Reservation: मराठ्यांनी जिंकली आरक्षणाची लढाई: हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय
2

Maratha Reservation: मराठ्यांनी जिंकली आरक्षणाची लढाई: हायकोर्टाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किसान सन्मान निधीचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? असं करा चेक
3

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! किसान सन्मान निधीचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का? असं करा चेक

Devendra Fadnavis: “झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्य शासन सहकार्य करणार”; देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis: “झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यासाठी राज्य शासन सहकार्य करणार”; देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.