मुकीहीमयांत्रि देवेंद्र फडणवीस (फोटो- ट्विटर)
गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्गात येत नसल्याने या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे कामकाज तात्काळ मार्गी लावावे. त्याचबरोबर, २८ किलोमीटरच्या महामार्गापैकी केवळ २ ते ३ किलोमीटरचा भाग व्याघ्र भ्रमणमार्गात येत असल्यास संपूर्ण महामार्गाचे काम थांबविणे योग्य नाही. त्यामुळे उर्वरित भागातील काम तातडीने सुरू करावे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने निश्चित केलेल्या ३२ अधिकृत व्याघ्र भ्रमणमार्गांचेच निकष ‘परिवेश’ (PARIVESH) पोर्टलवर लागू करावेत. तसेच जुन्या रस्त्यांचे डांबरीकरण आणि रुंदीकरण करताना अनावश्यक अडथळे निर्माण करू नयेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासोबतच वनालगतच्या शेतकऱ्यांना शाश्वत रोजगार आणि उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि एमआयडीसी यांच्या समन्वयातून बांबू लागवड व त्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येईल असे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गडचिरोली बनतंय देशाच्या विकासाचं नवं केंद्र! परिवर्तनाची गाथा देशभर पोहोचवा! फडणवीसांचे आवाहन
संरक्षित क्षेत्रालगत मोठ्या वृक्षांची तोड थांबवून बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे. उसाच्या तुलनेत बांबूला निम्मे पाणी लागते आणि त्यापासून इथेनॉल निर्मितीची मोठी क्षमता आहे. एमआयडीसीने बांबू लागवडीसाठी जागा भाडेतत्त्वावर घेऊन शेतकऱ्यांना वार्षिक भाडे द्यावे आणि त्या माध्यमातून इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प उभारावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील १८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे साडेपाच लाख हेक्टर क्षेत्र सामूहिक वनहक्कांतर्गत येते. या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी स्थापन होणाऱ्या समित्यांचा कार्यकाळ निश्चित करावा. ग्रामसभेने स्थापन केलेल्या सामूहिक वनहक्क समित्यांचा कार्यकाळ संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाशी सुसंगत (Co-terminus) असावा. तसेच तेंदूपत्ता आणि अन्य गौण वनोपजाच्या लिलावासाठी पारदर्शक, शास्त्रीय व निश्चित कार्यपद्धती (SOP) तयार करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Ans: गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांमुळे रखडू नयेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
Ans: २८ किलोमीटरच्या महामार्गापैकी केवळ २ ते ३ किलोमीटरचा भाग व्याघ्र भ्रमणमार्गात येत असल्यास संपूर्ण महामार्गाचे काम थांबवू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.






