फोटो सौजन्य: Pinterest
संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित तालुका म्हणून ओळखला जातो. विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जातो. 2024 मध्ये महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तालुक्यातील महिलांना मिळावा, यासाठी यशोधन कार्यालयातील यंत्रणेने रात्रंदिवस मेहनत घेऊन सुमारे 90 हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला होता. डिसेंबर 2025 पर्यंत अनेक महिलांना या योजनेअंतर्गत नियमित लाभ मिळत होता.
पेण तालुक्यात पहिल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन; ‘कृषी तरंग २०२६’ उत्साहात संपन्न
निवडणुकीपूर्वी सरकारने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन पूर्ण झाले नाही. उलट, सुरू असलेल्या योजनेतूनच आम्हाला वगळण्यात आले आहे, असा आरोप वडगाव पान येथील शेतकरी महिला मीना थोरात यांनी केला आहे. आम्ही गरीब असतानाही आमच्या नावापुढे ‘सरकारी नोकरी’ असा शेरा पोर्टलवर दिसत आहे. हा नेमका काय प्रकार आहे, असा सवाल उपस्थित करत सरकारने गरीब महिलांची फसवणूक केल्याची टीकाही त्यांनी केली.
Prakash Mahajan : “वनमंत्री गणेश नाईक यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारावा”, प्रकाश महाजन यांचा टोला
सरकारने विविध कारणे पुढे करत लाडकी बहीण योजनेतून 17,967 महिलांना वगळले आहे. यासोबतच निवडणुकीपूर्वी दिलेले 2100 रुपयांचे आश्वासन पूर्णपणे हवेत विरले आहे. उलट अनेक महिलांना मिळणाऱ्या रकमेतील कपात करण्यात आली आहे. केवायसी पूर्ण करूनही अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे. तसेच अनेक गरीब महिलांच्या नावापुढे पोर्टलवर ‘सरकारी नोकरी’ असा चुकीचा शेरा दाखवला जात असल्याने पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
फक्त निवडणुकीसाठी घोषणा करून नंतर मोठ्या संख्येने महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याने संगमनेर तालुक्यात सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.






