
"मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा..."; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
मालवणी परिसर पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक
झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
झोपड्यांचा सर्व्हे झाल्यानंतर यंत्रणांनी अहवाल देण्याचे निर्देश
नागपूर: मालवणी परिसरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करताना ‘ क्लस्टर मॉडेल ‘ विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत या परिसरातील अंबुजवाडी, दादासाहेब गायकवाड नगर व राजीव गांधी नगर येथील झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मालवणी परिसर पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठकीस गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार असलम शेख उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मालवणी परिसरातील झोपड्यांचे राहिलेले सर्वेक्षण पूर्ण करावे. म्हाडा व झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्याकडे असलेल्या क्षेत्रानुसार त्यांनी सर्व्हे करावा. मालवणी परिसरातील संपूर्ण झोपड्यांचा सर्व्हे झाल्यानंतर यंत्रणांनी एकत्रितरित्या अहवाल द्यावा. कायदेशीर अडचणी असलेल्या क्षेत्राविषयी स्वतंत्रपणे कार्यवाही करावी. ज्या ठिकाणी विकासाची कामे असतील, ती क्षेत्रे पुनर्विकासासाठी प्राधान्याने घ्यावीत.
🔸CM Devendra Fadnavis chaired the review meeting regarding Mumbai's Malvani area redevelopment project.
MoS Dr Pankaj Bhoyar and concerned officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मालवणी परिसर पुनर्विकास प्रकल्पा संदर्भात आढावा… pic.twitter.com/sLHVCJbIp8 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 13, 2025
‘क्लस्टर मॉडेल’ ने विकास केल्यास संपूर्ण मालवणी परिसराचा कमी कालावधीत पुनर्विकास होईल. हा झोपडपट्टी पुनर्विकासाचा मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पास गतीने पूर्णत्वास न्यावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बैठकीस अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) असीम कुमार गुप्ता, गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आदी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी सहभागी होते. बैठकीत सादरीकरण म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले.
मालवणी पुनर्विकास योजना थोडक्यात
मालवणी परिसरातील जमिनीचे क्षेत्रफळ 641 एकर आहे. यामध्ये राज्य शासन, म्हाडा, महापालिका आणि खासगी जमिनीचा समावेश आहे. त्यापैकी 565.98 एकर क्षेत्रावर झोपडपट्टी आहे. तसेच 75.02 एकर क्षेत्र खुले आहे. या परिसरातील अंदाजे झोपड्यांची संख्या 14 हजार इतकी आहे. परिसराच्या पुनर्विकासानंतर हे क्षेत्र झोपडपट्टीमुक्त होईल.
इतर मागासवर्ग बहुजन कल्याण संचालनालयाच्या https://dirobbwd.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन येथील मंत्री परिषद सभागृहात झाले.
यावेळी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सचिव आप्पासाहेब धुळाज यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी संकेतस्थळाविषयी संचालक सोनाली मुळे यांनी माहिती दिली. नागरिकांना या संकेतस्थळावर विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या योजनांची माहिती, अर्ज करण्याची सुविधा आहे तसेच तक्रारींना कृत्रिम बुद्धिमत्तेवर उत्तर देण्याची सुविधा आहे. त्याचप्रमाणे योजनांची माहिती देणारे ‘पॉडकास्ट’ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे.