Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: ‘एक कोटी लाडक्या बहिणींना…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला निर्धार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांना  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याची दुष्काळापासूनही मुक्ती करु असा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 18, 2025 | 02:35 AM
Devendra Fadnavis: ‘एक कोटी लाडक्या बहिणींना…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला निर्धार
Follow Us
Follow Us:

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी केले जाणार
लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार
पंचायतराज अभियाना’ चा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला

छत्रपती संभाजीनगर:  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन त्यांना शासन आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी होतील. राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ चा राज्यस्तरीय शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविले जाणार आहे.

लोकसहभाग अभियानाचा गाभा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उपस्थितांना  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मराठवाड्याची दुष्काळापासूनही मुक्ती करु असा निर्धार व्यक्त करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे योजनांची अंमलबजावणी करुन लाभ देण्याचे आणि प्रत्येक ग्रामस्थाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे अभियान आहे. लोकसहभाग या अभियानाचा मूळ गाभा आहे.

LIVE | मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरिय शुभारंभ 🕚 स. ११.०२ वा. | १७-९-२०२५📍छत्रपती संभाजीनगर#Maharashtra #PanchayatRaj #ChhatrapatiSambhajiNagar https://t.co/MHgx9BrYzk — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2025

लाडक्या बहिणींना उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आमच्या लाडक्या बहिणी यांना केवळ १५००/- रुपयांवर अवलंबून रहावे लागू नये, त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी अर्थसहाय्य देऊन लाडक्या बहिणींना सक्षम करण्यात येईल. प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था सुरु करुन जिल्हा बॅंकेमार्फत त्यांना १ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन त्यांच्या पाठीशी शासन उभे राहील. अशाप्रकारे राज्यातील एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार,असा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात लोकांच्या जीवनात परिवर्तन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे, त्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरु करण्यात आले आहे. पंतप्रधानाच्या नेतृत्वात देशाने प्रगती केली असून २५ कोटी लोक गरिबी रेषेखालून वर आले आहेत. आज १५ कोटी लोकांना स्वतःचे घर उपलब्ध होऊ शकले. लोकांच्या जीवनात परिवर्तन आले, हे सगळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात घडले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Maharashtra Politics: “… तर महाराष्ट्र कर्नाटकविरुद्ध याचिका दाखल करेल”; फडणवीसांचा स्पष्ट इशारा

ग्रामविकासाच्या अनेक योजना, अभियाने आलीत पण त्यात ठरविक गावेच पुढे गेली. आता या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून प्रत्येक गावांगावांतून  समृद्ध महाराष्ट्र घडेल. अशा स्पर्धांमध्ये कोणतेही गाव मागे राहू नये यासाठी हे अभियान सुरु केले आहे. या अभियानात केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना गावात राबविण्यात येतील. त्या माध्यमातून राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती आणि ४० हजार गावे मॉडेल म्हणून विकसित करू, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: Cm devendra fadnavis said make 1 crore lakhpati sisters didi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Lakhpati Didi Scheme
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा
1

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी
2

Devendra Fadnavis : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी फडणवीसांनी दिला शब्द! कृष्णाखोरे आणि कोकणातून आणणार पाणी

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य
3

Maharashtra Politics: ‘… हे रोज नवनवीन गॅझेट शोधून आणतात’; वडेट्टीवारांचे मराठा आरक्षणावर भाष्य

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
4

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.