Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असणार? फडणवीसांनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “2029 मध्ये…”

2029 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान हा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल असे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2025 | 06:15 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असणार? फडणवीसांनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “2029 मध्ये…”
Follow Us
Close
Follow Us:

Cm Devendra Fadnavis: सध्या राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आहे. केंद्रात भाजप एनडीए आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यानंतर एक चर्चा सातत्याने होताना दिसून येत आहे. 2029 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान हा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असेल असे म्हटले जात आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव देखील घेतले जात आहे. दरम्यान आता यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमधील ‘इंडिया ग्लोबल फोरम’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी 2029 मध्ये पंतप्रधान कोण असणार यावर उत्तर दिले आहे. या कार्यक्रमात फडणवीस यांनी 2024 मधील  लोकसभा निवडणुकीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी 2029 मधील भावी पंतप्रधान कोण असणार आणि त्यांचा उत्तराधिकारी कोण असणार यावर भाष्य केले आहे.

बिकेसीमधील ‘इंडिया ग्लोबल फोरम’ कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी 2029 मध्ये नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 2029 मध्ये नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार असल्याने त्यांच्या उत्तराधिकार्याबद्दल विचार करण्याची ही योग्य वेळ नाही.

काय म्हणाले होते संजय राऊत?

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजीनामा देण्यासाठी नागपूर दौऱ्यावर आले असल्याचा घणाघात केला होता. खासदार राऊत म्हणाले की, “संकेत स्पष्ट आहे, माहिती बाहेर येते सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदींनी जाहीर केल्याप्रमाणे धोरण 75 वर्षीय झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. त्यामुळे देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. कोणत्याही मंत्री प्रधानमंत्री राष्ट्रपती त्यांच्यामुळे सरसंघ चालकांनी त्यांना या त्यांच्या संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी ही चर्चा केली.  दहा-अकरा वर्षांनी जाऊन नागपुरात सरसंघचालक यांना भेटावं लागलं ही काय साधी गोष्ट नाही इतक्या वर्षात कधीच गेले नाही – ईश्वराचा देखील मृत्यू झाला. राम गेले, कृष्ण देखील एका बाणाने पारध्याच्या लोक सोडून गेले. प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागते. देव असो या मनुष्य असो. नरेंद्र मोदी यांचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल,” असे सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले.

Devendra Fadnavis Press : नरेंद्र मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल…; राऊतांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच बघतो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी महाराष्ट्रामधून असून त्यांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीसांकडे इशारा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी शोधण्याचे मुळात काहीच कारण नाही. मोदी हे आमचे नेते आहेत. अजून पुढचे अनेक काळ ते काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की, 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडेच बघतो आहे. आमच्यासोबत पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Cm devendra fadnavis said narendra modi will be next pm in 229 election india gloabl forum summit mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • LOKSABHA ELECTION
  • Mumbai News
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ
1

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ

Yogi Adityanath Meeting With PM Modi: UPत राजकीय हालचालींना वेग …; नरेंद्र मोदी-योगी आदित्यनाथांमध्ये गुप्त खलबतं
2

Yogi Adityanath Meeting With PM Modi: UPत राजकीय हालचालींना वेग …; नरेंद्र मोदी-योगी आदित्यनाथांमध्ये गुप्त खलबतं

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
3

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Maharashtra Politics: “जोपर्यंत देवाभाऊ आहे तोवर…”; जालन्यातून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका
4

Maharashtra Politics: “जोपर्यंत देवाभाऊ आहे तोवर…”; जालन्यातून मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.