Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Almatti Dam: अलमट्टीचा वाद पेटणार? CM फडणवीसांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र; उंची वाढवू नये अन्यथा…

महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत सिम्युलेशन आणि हायड्रानॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी’ यांच्याकडे सोपविले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2025 | 02:18 PM
Almatti Dam: अलमट्टीचा वाद पेटणार? CM फडणवीसांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र; उंची वाढवू नये अन्यथा…
Follow Us
Close
Follow Us:

१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे केंद्रीय मंत्र्यांना अलमट्टीबाबत पत्र
२. अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती निर्माण होणार
३. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी’ यावर अभ्यास करत आहे.

देवेंद्र फडणवीस/Devendra Fadnavis: कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये अलमट्टी धरणाचा वाद सुरु आहे. कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सांगली-कोल्हापूरमध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रातून धरणाची उंची वाढवू नये अशी विनंती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात काय लिहिले आहे?

कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी वाढविल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह कृष्णा नदीकाठच्या परिसराला महापुराचा गंभीर फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्राद्वारे केली आहे. या पत्रात बॅक वॉटरमुळे वाढणारा पूरधोका, नदीपात्रातील गाळ साचणे, वाहतूक क्षमतेवर होणारा परिणाम आणि बंधाऱ्यांमध्ये साचणारा गाळ यासह पूरस्थितीची गंभीरता स्पष्ट केली आहे.

महाराष्ट्र शासनाने अलमट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत सिम्युलेशन आणि हायड्रानॉमिक्स पद्धतीने अभ्यास करण्याचे काम ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी’ यांच्याकडे सोपविले आहे. या संबंधित अहवाल प्राप्त होण्यापूर्वी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.

अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्राद्वारे केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्याकडे विनंती कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी वाढविल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह कृष्णा नदीकाठच्या परिसराला महापुराचा गंभीर फटका बसण्याची शक्यता आहे.… — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2025

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची (Almatti Dam) जलाशय पातळी 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दरवर्षीची पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या जीवन, मालमत्ता आणि शेतीला मोठा फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर, दोन्ही राज्यांतील कृष्णा नदीकाठच्या नागरिकांच्या हितासाठी कर्नाटक शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंतीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

 

Web Title: Cm devendra fadnavis write letter to cr patil for almatti dam hieght sangli kolhapur flood issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 02:18 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांचे मराठी भाषेबाबत महत्वाचे विधान; म्हणाले, “… हा आपल्या सर्वांचा सन्मान”

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
2

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Devendra Fadnavis: “बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
3

Devendra Fadnavis: “बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश
4

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.