Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसवड पालिकेचा अजब कारभार; व्यापारी गाळे विनाभाडे, लिलाव मात्र रखडले

काही गाळे प्रत्यक्षात वापरात असूनही त्यातून पालिकेला कोणतेही भाडे उत्पन्न मिळत नसल्याचे समोर येत आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध विकासकामे झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2026 | 11:54 AM
म्हसवड पालिकेचा अजब कारभार; व्यापारी गाळे विनाभाडे, लिलाव मात्र रखडले

म्हसवड पालिकेचा अजब कारभार; व्यापारी गाळे विनाभाडे, लिलाव मात्र रखडले

Follow Us
Follow Us:

म्हसवड : म्हसवड नगरपरिषदेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, व्यावसायिकांसाठी बांधण्यात आलेले व्यापारी गाळे विनाभाडे मर्जीतल्या कार्यकर्त्यांना वर्षानुवर्षे वापरायला दिल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे, या गाळ्यांच्या अधिकृत लिलावाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक व्यापारी मात्र अजूनही प्रतीक्षेतच असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

म्हसवड नगरपरिषदेने सुमारे 10 वर्षांपूर्वी शहरातील व्यापारी गरजा लक्षात घेऊन मंडई इमारतीतील गाळे बांधले होते. मात्र, आजतागायत या गाळ्यांचा नियमित आणि पारदर्शक लिलाव करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, काही गाळे प्रत्यक्षात वापरात असूनही त्यातून पालिकेला कोणतेही भाडे उत्पन्न मिळत नसल्याचे समोर येत आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात विविध विकासकामे झाली. मात्र, त्यानंतर सत्तेत आलेल्या परिवर्तन पॅनेलच्या काळात या कामांची देखभाल आणि व्यवस्थापन दुर्लक्षित झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या पालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून, काही नवीन विकासकामे सुरू आहेत तर काही अंतिम टप्प्यात आहेत. त्यात व्यापारी संकुलाच्या गाळ्यांचाही समावेश आहे. तर पालिका इमारतीतील काहि गाळे लिलावाअभावी रिक्त किंवा अनधिकृत वापरात असल्याने पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.

यातील गंभीर बाब म्हणजे, नगरपरिषद आवारातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणचे काही गाळे गेल्या चार वर्षांपासून आधार केंद्रासाठी विनाभाडे देण्यात आल्याचे समजते. हे गाळे लिलावाद्वारे देणे अपेक्षित असताना, कोणत्या नियमांनुसार व कोणत्या आधारावर विनाभाडे देण्यात आले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

तसेच, पूर्वी लिलाव झालेल्या काही गाळ्यांचे धारकांनी ते इतर व्यावसायिकांना भाडेतत्वावर दिल्याचे, तसेच काही ठिकाणी पालिकेच्या परवानगीशिवाय व्यवहार झाल्याचेही बोलले जात आहे. यामुळे नियमभंग होत असून पालिकेच्या महसुलालाही फटका बसत आहे. व्यवसायाला चालना देण्यासाठी उभारलेले हे व्यापारी गाळे पारदर्शक पद्धतीने लिलावाद्वारे उपलब्ध करून देणे आवश्यक असताना, सध्याची परिस्थिती मात्र उलट असल्याचे दिसून येते. त्यामुळे या सर्व गाळ्यांचा तात्काळ जाहीर लिलाव काढून ते पात्र व गरजू व्यवसायिकांना देण्यात यावेत, अशी मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून जोर धरत आहे. पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमबाह्य वापर थांबवावा आणि महसूल वाढीसाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भिवंडीत आरोग्यव्यवस्थेच्या निष्काळजीपणाचा बळी! रुग्णवाहिका न मिळाल्याने घरात प्रसूती; नवजात बाळाचा मृत्यू

Web Title: Commercial units rent free yet auctions stalled in mhaswad municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • Commercial Gas
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!
1

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
2

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध
3

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
4

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.