
MNS Warning to Auto Drivers:
Mumbai News: “रिक्षा चालवणार नाही म्हणून मुंबई बंद होईल” अशा धमक्या देणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मुंबई म्हणजे काही बाहेरून आलेले लोक नाहीत, तर येथे राहणारा मराठी माणूसच मुंबई आणि महाराष्ट्राची ओळख आहे. कोणत्याही बाहेरच्या घटकांना महाराष्ट्राला वेढा घालता येणार नाही,” अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत मुंबई आणि महाराष्ट्राला धमक्या देणाऱ्यांना इशारा दिला आहे.
मराठी भाषा सक्तीचा कायदा २०१२ पासून अस्तित्वात असूनही अंमलबजावणी का झाली नाही, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला. मराठी येत नसतानाही परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच प्रताप सरनाईक यांनीही अमराठी रिक्षाचालकांना परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
RJ Sumit : एका संत्र्यामुळे दोन्ही किडन्या निकाम्या, मरणाच्या दारातून परता आरजे सुमित; सांगितला
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर प्रतिक्रिया देताना देशपांडे म्हणाले, “माझ्या आईने मला शिकवलं आहे की, कुत्रा भुंकला तर आपण त्याच्यावर भुंकायचं नसतं.”
रिक्षा-टॅक्सी चालकांना केवळ काही शब्द नव्हे तर संपूर्ण मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात राहून उपजीविका करणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्ये केंद्र सरकार भांडण लावते, असा आरोप करत या राज्यांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
संजय निरुपम यांच्यावर टीका करत देशपांडे यांनी त्यांना “टुकार माणूस” अशा . त्यांच्या वक्तव्यांकडे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगत, संप करून दाखवावा आणि महाराष्ट्राला वेढा घालता येतो का ते स्पष्ट करावे, असे त्यांनी आव्हान दिले.
या प्रकरणावर बोलताना त्यांनी भाजपवर “रडीचा डाव” खेळल्याचा आरोप केला. महिलांच्या भावना समजून घेण्याची गरज असून, चुका झाल्यास त्यांचा संताप सहन करावा लागेल, असे त्यांनी म्हटले.
30 वयाच्या आतच महिलांमध्ये आढळतेय ‘Premature Ovarian Failure’ ची समस्या
महानगरपालिकेच्या भूखंडांचे गैरव्यवहार होत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला. बाहेरचे लोक येऊन हे भूखंड लाटत असल्याचे सांगत, विविध संस्थांना दिल्या जाणाऱ्या भूखंडांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्तेत बसलेले लोकच आता मालकासारखे वागत असून, महानगरपालिकेचा खजिना लुटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका करत देशपांडे यांनी त्यांना थेट “मराठी द्वेष्टे” असल्याचा आरोप केला. ते केवळ विशिष्ट समाजापुरते मर्यादित राहून त्यांच्याच संस्थांना प्राधान्य देत असल्याचे त्यांनी म्हटले.