Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप नेत्यांकडून निष्क्रीयतेची कबुली; कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा दावा

महापालिकेतील सत्ताधारी भाजप गेल्या पाच वर्षात शहरातील काेणताही प्रश्न साेडवू शकला नाही, हे त्यांच्या नेत्यांच्या विधान आणि कृत्यातून स्पष्ट हाेत आहे. त्यांची निष्क्रीयेता आम्ही पुणेकरांसमाेर मांडत आहाेत, आगामी महापालिका निवडणुकीत काॅंग्रेसचे संख्याबळ हे निर्णायक असेल असा विश्वास कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ‘काॅफी विथ नवराष्ट्र’ या चर्चेत व्यक्त केला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2022 | 02:03 PM
भाजप नेत्यांकडून निष्क्रीयतेची कबुली; कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा दावा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महापालिकेतील सत्ताधारी भाजप गेल्या पाच वर्षात शहरातील काेणताही प्रश्न साेडवू शकला नाही, हे त्यांच्या नेत्यांच्या विधान आणि कृत्यातून स्पष्ट हाेत आहे. त्यांची निष्क्रीयेता आम्ही पुणेकरांसमाेर मांडत आहाेत, आगामी महापालिका निवडणुकीत काॅंग्रेसचे संख्याबळ हे निर्णायक असेल असा विश्वास कॉंग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ‘काॅफी विथ नवराष्ट्र’ या चर्चेत व्यक्त केला. तसेच सध्याचे हाेणारे पक्षांतर हे ‘ब्लॅकमेल’ केल्यामुळेच हाेत असून, भविष्यात हेच लाेक पुन्हा परत येतील असे मतही त्यांनी व्यक्त केले. आगामी महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविली पाहीजे असे माझे मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहर काॅंग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतलेले शिंदे यांनी महापािलकेतील पक्षाचा गटनेता म्हणून पण जबाबदारी सांभाळली आहे. १९९७ पासून काॅंग्रेसचे निष्ठावंत नगरसेवक म्हणून पाचवेळा निवडून आले आहेत. याच अनुभवाच्या जाेरावर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

भाजपच्या भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे

महापािलकेत सत्तेवर आल्यानंतर भाजपने केलेल्या अनेक भ्रष्टाचाराची उदाहरणे सांगता येतील. यामध्ये समान पाणी पुरवठा याेजनेचे काम २८०० काेटी रुपयांपर्यंत गेले हाेते. विराेधकांनी याविषयावर आवाज उठविल्यानंतर तेच बाराशे काेटी रुपयांपर्यंत खाली आणले गेले. नदी सुधार याेजनेचे सर्व्हेक्षण न करता सुमारे नऊशे काेटी रुपयांची निविदा काढली गेली. महापािलकेच्या सभागृहात आम्ही भ्रष्टाचाराबद्दल वेळाेवेळी जाब विचारला आहे. समान पाणी पुरवठा याेजनेसाठी दाेन हजार काेटीचे बाॅंड काढले गेले. ही रक्कम बॅंकेत डिपॉझिट ठेवली आहे. या कर्जापाेटी ६३ काेटी रुपये व्याज दिले जात आहे. नवीन रुग्णालयासाठी आता साडे तीनशे काेटी रुपयांचे कर्ज परदेशातील बॅंकडून घेतले जाणार आहे. आता ही माहीती पुणेकरांपर्यंत पाेहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपकडून जनतेची फसवणुक हाेते ते निदर्शनास आणून देणार आहाेत. असंही यावेळी शिंदे म्हणाले.

प्रश्न न सुटल्याची त्यांच्या नेत्यांकडून कबुली

शहरातील वाहतुक आणि पाणी प्रश्न साेडविण्यासाठी पुणे महापालिकेचे विभाजन करून दाेन महापालिका निर्माण करावे, असे मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. हे वक्तव्य म्हणजे पाच वर्षात ते हे प्रश्न साेडवू शकले नाहीत, हे स्पष्ट हाेत आहे. तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रश्न साेडविण्याची मागणी करीत खासदार गिरीश बापट यांनीही आंदाेलन केले हाेते. तर चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष पद मिळालेल्या प्रभागातील प्रश्न ही सुटले शकले नाहीत. यातून विकास झाला नाही याची कबुली भाजपकडून दिली जात आहे असा दावाही अरविंद शिंदे यांनी केला.

कार्यकर्त्यांना सन्मानपूर्वक स्थान हवे तरच आघाडी

महािवकास आघाडीने आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला, तर पक्षाच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळाला पाहीजे, एवढ्या जागा मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक पक्षाला स्वत:चा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडी, युती करणे मान्य करता येईल, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे निवडणुक लढविली तर कार्यकर्त्याला संधी मिळू शकते. ज्या भागात पक्षाची ताकद कमी आहे, त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्या कार्यकर्त्याला बळ दिले तर भविष्यात या भागात पक्षाची ताकद वाढण्यास मदत हाेऊ शकते असे शिंदे यांनी समाविष्ट गावांचे उदाहरण ते स्पष्ट केले. स्वतंत्रपणे निवडणुक लढविली तर यापेक्षा काय वाईट हाेणार आहे ? असा सवालही त्यांनी व्यक्त केला.

दुरावलेला मतदार पुन्हा वळविणार

काॅंग्रेस पक्षाची ओळख ही धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आहे. परंतु गेल्या काही निवडणुकांमध्ये पक्षाचा हक्काचा मतदार असलेला एक वर्ग भाजपकडे गेला आहे. या वर्गाचीही भाजपकडून फसवणुक झाली आहे. त्याला पुन्हा आपल्याकडे वळविण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. मुस्लीम, दलित मतांमध्ये फुट पडावी म्हणून भाजपची बी टिम म्हणून काम करणारे काेणते पक्ष आहे हे आता मतदारांना समजले आहे. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काॅंग्रेसला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं.

[read_also content=”झेडपीच्या ५४६ शिक्षकांना मिळणार पगारवाढ https://www.navarashtra.com/maharashtra/546-teachers-of-zp-will-get-salary-increase-nrdm-322593.html”]

मला कामाची माेठी संधी

राज्यात सत्ता असताना, माझ्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी साेपविली गेली. अवघ्या दाेन महीन्यातच राज्यातील महािवकास आघाडीची सत्ता गेली. पक्ष सत्तेत असताना पक्षाची वाढ करणे साेपेे असते. परंतु आता विराेधी पक्षात असताना मला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे असे मी मानताे. हे आव्हान मी स्विकारले असून, प्रत्येक प्रभाग, ब्लाॅक स्तरावर महागाईविराेधात आंदाेलन केले, याच विषयावर आम्ही नागरीकांशी संवाद साधत आहाेत. पुढील याच पद्धतीने काम केले जाणार आहे.

Web Title: Confession of inaction by bjp leaders congress city president arvind shindes claim nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2022 | 02:03 PM

Topics:  

  • BJP
  • chandrakant patil
  • Congress
  • Girish bapat
  • NAVARASHTRA
  • pune news

संबंधित बातम्या

Sindhudurg : सिंधुदुर्ग निवडणूक वाद: निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव?
1

Sindhudurg : सिंधुदुर्ग निवडणूक वाद: निलेश राणे, रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तणाव?

Pune News : Phule Wada स्मारक व्यवस्थापनाकडे देण्याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध
2

Pune News : Phule Wada स्मारक व्यवस्थापनाकडे देण्याला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध

Gaja Marne Bail : गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; खासदार मोहोळांना मोठा धक्का
3

Gaja Marne Bail : गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; खासदार मोहोळांना मोठा धक्का

NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार
4

NCP Politics: तिजोरीच्या चाव्यांवरून नव्या वादाची ठिणगी; लाडकी बहीण योजनेवरून प्रफुल्ल पटेलांचा पुनरूच्चार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.