Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर काल सकाळी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महापौर जयश्रीताई सोनकांबळे आणि नूतन उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे यांनी आपापल्या पदांचा अधिकृत पदभार स्वीकारला.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 11, 2026 | 01:14 PM
Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

Latur Municipal Corporation: लातूर महापालिकेत काँग्रेसचा झेंडा; महापौर जयश्री सोनकांबळेंचा पदभार स्वीकार

Follow Us
Follow Us:
  • लातूर महापालिकेत तक्रारींसाठी स्वतंत्र ‘खिडकी’
  • महापौर-उपमहापौरांनी स्वीकारला पदभार
  • आमदार अमित देशमुखांनी दिली माहिती 
Latur Municipal Corporation: लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर काल सकाळी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महापौर जयश्रीताई सोनकांबळे आणि नूतन उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे यांनी आपापल्या पदांचा अधिकृत पदभार स्वीकारला. माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी आ. देशमुख यांनी महापालिकेत तक्रारींसाठी स्वतंत्र खिडकी योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. यावेळी मनपा आयुक्त मानसी मीना याही उपस्थित होत्या. महापालिका प्रवेशद्वारावर आकर्षक रंगीबेरंगी रांगोळी, आसमंतात सनईचे सूर आणि कार्यकत्यांचा लोटलेला अमाप उत्साह यांच्या साक्षीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा अधिक रंगतदार झाला. आ. अमित देशमुख आणि आयुक्त मानसी मीना यांनी महापौर-उपमहापौरांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

Latur Crime News: लातूरमध्ये घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन सराईत चोरटे अटकेत

जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या अनुषंगाने माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “आगामी काळात राज्यात राजकीय परिस्थिती कशी राहील, हे पाहून लातूर जिल्हा परिषदेतील राजकीय निर्णय घेता येईल, जिल्हा परिषद निवडणुकीत आमची कामगिरी समाधानकारक राहील. काही ठिकाणी आम्ही कमी पडलो, हे खरे असले तरी आम्हाला गेल्या खेपेपेक्षा दुपटीने जागा मिळाल्या. आपल्या राजकीय प्रवासात आवश्यकते प्रमाणे आक्रमक भूमिका घ्यावी लागते, अशी आव्हाने पेलण्याचे आम्ही लोकनेते विलासराव देशमुख यांच्याकडून शिकलो आहोत. लातूर जिल्ह्यातील जनता काँग्रेसच्या विचारांमागे आहे. आम्ही प्रकाशित केलेल्या जाहिरनाम्याची शत-प्रतिशत अंमलबजावणी होईल, असे ठामपणे सांगून त्यांनी शेवटी लातूर महानगरपालिकेत नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र खिडकी तयार करण्यात येईल आणि नागरिकांना भ्रष्टाचाराच्या संदर्भातील तक्रारी त्या खिडकीच्या माध्यमातून दाखल करता येतील,” अशी घोषणा केली.

Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात

आ. अमित देशमुख यांनी काँग्रेस व वंचितचे निर्विवाद बहुमत स्थापित झाल्याबद्दल समाचान व्यक्त केले, महापौर-उपमहापौरांची कार्यकीर्द यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन लातूरचे प्रश्न सोडविण्यासाठी ही टीम सतत कार्यरत राहील, यानिमित्ताने विकासाचा नवा अध्याय लातूर शहरात सुरू होत आहे. काँग्रेस आणि वंचितची आघाडी अभेद्य असून, जबाबदारीचे वाटप करुन वर्किंग रिलेशिय कशा पद्धतीने राहील, याच्या चर्चा सुरू होत्या. आमच्यात एकवाक्यता आहे, असे सांगितले.

या पदग्रहण सोहळ्यासह काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे सर्व नगरसेवक, दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तब्बल नऊ वर्षांचे प्रशासकराज संपुष्टात आल्यानंतर झालेल्या या पदग्रहण समारंभामुळे लातूर पालिकेचा प्रशासकीय चेहरा बदलून मानवी चेहरा प्राप्त झाल्याचे व कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची गजबज वाढल्याचे चित्र आज दिसत होते. राजकीय वर्तुळात या शहरावर असलेली काँग्रेसची पकड अधिक घट्ट झाल्याची चर्चा सोहळ्यानंतर सुरू झाली.

Web Title: Congress flag in latur municipal corporation jayashree sonkamble elected as mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 01:14 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • Congress
  • Latur Municipal corporation Election 2026

संबंधित बातम्या

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक
1

Rahul Gandhi INDIA Bloc Protest : ‘गैरहजर खासदारांची यादी तयार करा!’ राहुल गांधींचा थेट आदेश, SIR आंदोलनावरून आक्रमक

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
3

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
4

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.