Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत; थेट बेडरुमध्ये घुसून…

हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. यावरुन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2025 | 05:52 PM
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत; थेट बेडरुमध्ये घुसून...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत; थेट बेडरुमध्ये घुसून...

Follow Us
Close
Follow Us:
  • हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत
  • थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी?
  • सपकाळांनी साधला सरकारवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. सपकाळ वास्तव्याला असलेल्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमात पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याचा आरोप केला जातोय. यावरुन हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. कोणाच्या आदेशाने आमच्यावर पाळत ठेवली जात आहे? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सकाळी एक पोलीस थेट बेडरूमध्ये घुसून टेहळणी करत होता, तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहात का? पत्रकार आले आहेत का ?, यासह अनेक प्रश्न विचारले. तुम्ही बेडरुममध्ये प्रवेश का केला, कोणाचे आदेश आहेत, असे विचारले असता, वरिष्ठांचे आदेश आहेत असे म्हणत वरिष्ठांना फोनवर बोला असे सांगितले. अशा पद्धतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पाळत ठेवली जात आहे. यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून विरोधकांवर पाळत ठेवण्याची भाजपाची प्रवृत्ती आहे, आधी पेगॅसेस नंतर फोन टॅपिंग केले. आता थेट बेडरुमपर्यंत ते पोहचले आहेत परंतु अशा दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मुंबईतील एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

पवईत काल पोलिसांनी रोहित आर्य नावाच्या एका व्यक्तीचे एन्काऊंटर केले. या व्यक्तीने लहान मुलांना ओलीस ठेवले होते हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, मुलांची सुटका महत्वाची होती पण हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले त्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या वेळी एनएसजीचे पथक उपस्थित असताना पोलिसांनी गोळ्या झाडून त्याची हत्या करण्याचे कारण काय. तो व्यक्ती मनोरुग्ण आहे असे सांगतिले जात आहे पण याच व्यक्तीने सुंदर माझी शाळा सारखे सरकारी उपक्रम राबिवले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याबरोबर एकाच व्यासपीठावर तो उपस्थित होता. या घटनेची चौकशी झाली पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

गुन्हेगारांचा आका देवेंद्र फडणवीस

डॉक्टर संपदा मुंडे यांना दबावामुळे आत्महत्या करावी लागली, ही आत्महत्या नसून हत्याच आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव घेतले जात आहे. निंबाळकर यांनी अनेकांना त्रास दिला आहे, त्यांचा अपहरण, खंडणी, मारहाण यासारख्या गंभीर गुन्ह्यात हात असूनही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणतीही चौकशी न करता त्यांना क्लिन चिट देऊन टाकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्याच्या एका फुल व्रिकेत्यानेही भाजपाच्या पाच पदाधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवून आपल्याला आत्महत्या का करावी लागत आहे हे सांगितले आहे. पोलिस सामान्य जनतेच्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत. सत्ताधारीच गुंडगिरी करत असल्याने कारवाई होत नाही. फडणवीस यांच्या काळात राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळली असून यात भाजपाचे नेते पदाधिकारी यांची गुंडगिरी वाढली आहे. या सर्वांना फडणविसच जबाबदार असून फडणवीस गुन्हेगारांचे आका आहेत असे सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress is alleging that the police are keeping an eye on harshvardhan sapkal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Maharashtra Police

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांच्या थकीत कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती द्या; माजी खासदार संजय पाटील यांची मागणी
1

शेतकऱ्यांच्या थकीत कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती द्या; माजी खासदार संजय पाटील यांची मागणी

भाजप वापरून फेकून देणारा पक्ष, अजित पवार अन् शिंदे स्वगृही परततील; रोहित पवारांची भविष्यवाणी
2

भाजप वापरून फेकून देणारा पक्ष, अजित पवार अन् शिंदे स्वगृही परततील; रोहित पवारांची भविष्यवाणी

‘बेबी किडनॅपिंग’चा कट फसला, सांगली पोलिसांनी लावला बालकाच्या अपहरणाचा छडा
3

‘बेबी किडनॅपिंग’चा कट फसला, सांगली पोलिसांनी लावला बालकाच्या अपहरणाचा छडा

Karad politics : अतुलबाबांचे धक्कातंत्र, विरोधकांमध्ये खळखळ; आजी-माजी पालकमंत्र्यांना टशन
4

Karad politics : अतुलबाबांचे धक्कातंत्र, विरोधकांमध्ये खळखळ; आजी-माजी पालकमंत्र्यांना टशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.