Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या थकीत कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती द्या; माजी खासदार संजय पाटील यांची मागणी

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 31, 2025 | 06:26 PM
शेतकऱ्यांच्या थकीत कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती द्या; माजी खासदार संजय पाटील यांची मागणी

शेतकऱ्यांच्या थकीत कर्जवसुलीला तात्काळ स्थगिती द्या; माजी खासदार संजय पाटील यांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
  • शेतकऱ्यांच्या थकीत कर्जवसुलीला तत्काळ स्थगिती देण्याची मागणी
  • माजी खासदार संजय पाटील आक्रमक

सांगली : सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करणे आणि इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जवसुलीला तत्काळ स्थगिती द्या, अशी आग्रही मागणी केली. उपोषणात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी संजय पाटील, प्रभाकर पाटील, चंद्रकांत कदम, प्रमोद शेंडगे, दिग्विजय पाटील, सुखदेव पाटील, गजानन कुल्लोळी, सुनिल पाटील, विक्रम पाटील, सुनिल जाधव, महादेव पाटील, नितीन पाटील, प्रभाकर पाटील, ईश्वर व्हनखंडे, नामदेव पाटील, संदीप पाटील, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

माजी खासदार पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेती व शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून, त्याचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अशावेळी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय राहिला आहे. राज्य शासनाने वेळकाढूपणा न करता लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करणेबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

 कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव

पाटील म्हणाले, गेल्या काही वर्षापासून सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. शेती करताना शेतकरी सोसायटी, पतपेढया व बँकामधून कर्जे घेत असतात, परंतु शेती पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्पन्न न मिळाल्यामुळे त्यांना कर्जे भरणे शक्य होत नाही. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हिच अवस्था झाली आहे. शेती पिकाचे नुकसान होऊनही कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जातो. अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय शेतकरी हिताचा आहे.

Web Title: Sanjay patil has made a big demand from the government regarding the farmers issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 06:25 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • sanjay patil

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत ९ हजार लाभार्थ्यांना मिळणार शेततळी
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारच्या ‘या’ योजनेतंर्गत ९ हजार लाभार्थ्यांना मिळणार शेततळी

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा
2

Sugarcane Price Dispute : “ऊसाला साडेतीन हजाराचा दर द्या अन्यथा…”, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधीचा इशारा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत; थेट बेडरुमध्ये घुसून…
3

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत; थेट बेडरुमध्ये घुसून…

Nashik Farmers: फार्मर आयडी, ईकेवायसीचा अडथळा! १४,७०५ पैकी ६३५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले अनुदान
4

Nashik Farmers: फार्मर आयडी, ईकेवायसीचा अडथळा! १४,७०५ पैकी ६३५९ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले अनुदान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.