Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ नेत्याने केली राजीनाम्याची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 19, 2024 | 11:04 AM
गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक; 'या' नेत्याने केली राजीनाम्याची मागणी

गृहमंत्री अमित शाहांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक; 'या' नेत्याने केली राजीनाम्याची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधाननिर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या गृहमंत्री अमित शाहांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करत रमेश चेन्नीथला म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचाही भाजपाने सातत्याने अपमान केला आहे. संविधानाने घालून दिलेल्या मार्गाने भाजपाचे सरकार काम करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला आरएसएसचा पहिल्यापासूनच विरोध आहे आणि तो लपून राहिलेला नाही. आताही भाजपा आरएसएसचे लोक बाबासाहेबांचे संविधान बदलण्याच्या वल्गना करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेस पक्षाने नेहमीच सन्मान केला आहे. व त्यांनी घालून दिलेल्या मार्गानेच काँग्रेस पक्ष तसेच काँग्रेस सरकारांनी काम केलेले आहे. अमित शाह यांनी ज्या पद्धतीने संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल विधान केले हे त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून आले आहे, असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

हे सुद्धा वाचा : अमित शाहांच्या विधानावरुन नाना पटोले आक्रमक; म्हणाले; आता भाजपचा…

दलित, आदिवासी, मागासवर्गीय समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची मानसिकता अत्यंत द्वेषाची आहे. भाजपा शासित राज्यात मागासवर्गीय समाजावर अनन्वीत अत्याचार होतात. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनच्या उद्घाटनाला मोदी सरकारने बोलावले नाही तसेच अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे आमंत्रणही दिले नव्हते यातूनच भाजपाची दलित, आदिवासी समाजाबदद्ल असलेली मानसिकता दिसून येते, असेही रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंगळवारी १७ डिसेंबर रोजी राज्यसभेत संविधानावरील चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला चांगलेच घेरले. त्यावेळी अमित शाह यांनी काँग्रेस आता आंबडेकर, आंबेडकर असा घोषा लावत आहे. एवढे जप जर देवाचा केला असता तर स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केले. शाह पुढे म्हणाले की काँग्रेसला आंबेडकर यांचे नाव घेण्याची जास्त गरज आहे. परंतू जनतेला त्यांचा खरा इरादा माहिती आहे.

अमित शाह यांच्या वक्तव्याला काँग्रेसने आंबेडकर यांचा अपमान म्हटले आहे. मल्लिकार्जून खरगे यांच्यापासून राहुल गांधीपर्यंत सर्वांनी या मुद्द्याला उचलले आणि हा दलितांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. शाह यांचे वक्तव्य आणि संपूर्ण प्रकरणाला राहुल गांधी यांनी मनुस्मृती आणि आरएसएसशी जोडले आहे.

Web Title: Congress is angry with home minister amit shahs statement nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2024 | 11:03 AM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक
1

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
3

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.