Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीच्या दिवसात बळीराजा संकटात, महायुतीचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही; काँग्रेसची टीका

महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही. शेतकरी संकटात असून मदतीचे काय, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 15, 2026 | 06:06 PM
सणासुदीच्या दिवसात बळीराजा संकटात, महायुतीचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही; काँग्रेसची टीका

सणासुदीच्या दिवसात बळीराजा संकटात, महायुतीचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही; काँग्रेसची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात यावर्षी सरासरी २५ टक्के पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे. शेतातील उभी पिकं करपून गेली आहेत. शेतकरी मोठ्या संकटात असून आत्महत्या वाढतायेत. राज्य सरकारने कर्जमाफी केली, त्याचा फायदा झालेला नाही. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्याला बसत आहेत पण महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही. शेतकरी संकटात असून मदतीचे काय, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

 

दुष्काळावर बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, सोयाबीन, कापसाचे उत्पन्न या वर्षी पावसाअभावी कमालीचे कमी होण्याचे चित्र आहे. तुर, मूग, उडीद यासह डाळींब, केळी, पेरू अनेक पिकांना मोठा फटका बसला आहे. विदर्भ मराठवाड्यासह अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने रब्बी पिके येण्याची शक्यता नाही. नगरपालिका क्षेत्रात तीन चार दिवसातून एकदा पाणी येत आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सणासुदीचे दिवस आहेत पण बळीराजा मात्र चिंतेत आहे, मुलांचे शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क कसे भरायचे ही चिंता शेतकऱ्याला सतावत आहे. राज्य सरकारच्या योजना फक्त कागदावरच दिसत असून कर्जमाफी व मदतीच्या नावाखाली सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे.

महागाई, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना राज्यातील भाजपा महायुती सरकार मात्र मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लीम वादाला खतपाणी घालून जनतेच्या ज्वलंत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. भाजपाचे राज्यातील सरकार जनतेच्या मुळ प्रश्नावर बोलत नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे समान नागरी कायद्यावर बोलत आहेत, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर हे सरकार बोलतच नाही असेही अतुल लोंढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा  : ६० वर्षांचा निष्ठावान सांगाती आणि विश्वासू सहकारी गमावला; माजी मंत्री मदन बाफना यांच्या निधनाने शरद पवार भावुक

Web Title: Congress leader atul londhe has criticized the mahayuti government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Atul Londhe Congress
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
1

पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

पारंपारिक शेतीपेक्षा उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज, तरच…; शरद पवारांनी मांडले मत
2

पारंपारिक शेतीपेक्षा उद्योगांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज, तरच…; शरद पवारांनी मांडले मत

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?
3

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा
4

एमपीएससी पेपरफुटीविरोधात रोहित पवार आक्रमक; लातुरमधून प्रशासनाला दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.