Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान

सातारा गॅझेटवरून आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नसल्याचे सांगत बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला याबाबत ठोस धोरण राबवण्याचे आवाहन केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2025 | 06:54 PM
Maratha Reservation: “… आरक्षण शक्य नाही”; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे खळबळजनक विधान
Follow Us
Close
Follow Us:
राज्य सरकारने काढला मराठा आरक्षणचा जीआर
गॅझेटच्या आधारे आरक्षण देता येणार नाही
समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे, सरकारची जबाबदारी

कराड: Balasaheb Thorat: सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करून मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे, ही त्यांची जबाबदारी आहे. आरक्षणाचा जीआर पाहिल्यानंतर संभ्रम व काळजी निर्माण होत आहे. न्याय द्यायचा असेल तर ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्रपणे न्याय द्यावा, “गॅझेटच्या आधारे आरक्षण देता येत नाही. मात्र मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि आरक्षणाची गरज आहे,“ असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

सातारा गॅझेटवरून आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नसल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारला याबाबत ठोस धोरण राबवण्याचे आवाहन केले.मराठा आरक्षणाचे आंदोलन थांबविण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करताना थोरात म्हणाले, हा अत्यंत परिपक्व व महत्वाचा निर्णय आहे. आंदोलन चिघळले असते तर, त्याचे दुष्परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर झाले असते. म्हणून त्यांनी महाराष्ट्राची, मुंबईची व सर्वसामान्यांची काळजी घेत आंदोलन थांबवले, ही त्यांची दूरदृष्टी आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, ते पुरोगामी विचारांचे व्यक्तिमत्व आहेत, मात्र सध्या ते सरकारमध्ये असह्य मानसिकतेने काम करत आहेत, हे दुःखद आहे.भारतीय जनता पक्षाचे ध्येय केवळ सत्ता हेच असून, ते कोणतीही पद्धत वापरायला मागे हटत नाहीत. पक्षफोड, निवडणूक आयोगाचा ताबा, धर्माचा राजकारणात वापर, समाजात भेद निर्माण करणे हे सर्व लोकशाहीला अपुरक असल्याची टीका थोरात यांनी केली. राज्यातील रस्ते ठेकेदार आत्महत्या करत आहेत.

संजय निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा योजनांचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत, हे सरकारचे अपयश आहे, असे थोरात यांनी सांगितले. वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेत सर्वधमय व सर्वपक्षीय लोक सहभागी होत असतात. मात्र भाजपाने बोलघेवडे महाराज तयार करून वारकरी परंपरेचा अवमान केल्याचा आरोप थोरात यांनी केला. लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी मिळून जागृतीने व प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. लोकशाही निरोगी झाली पाहिजे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे आवाहन  थोरात यांनी केले.

Bhujbal On Jarange Patil: “… तर मी गप्प कसा राहू?”; छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य

छगन भुजबळांचे मराठा आरक्षणावर मोठे भाष्य

मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या जीआरवर भाष्य केले आहे. एका तासात दोन जीआर निघाले. त्यावर शासनाच्या सचिवांची सही आहे. पहिल्या जीआरमध्ये असणारा पात्र हा शब्द दुसऱ्या जीआरमध्ये काढण्यात आला. कारण त्या शब्दावर जरांगे पाटलांनी आक्षेप घेतला होता. दुसऱ्या जीआरमध्ये पात्र शब्द काढला गेला. तर मी गप्प कसा राहू शकतो? मी माझी प्रतिक्रिया देणारच.

 

 

Web Title: Congress leader balasaheb thorat statement on maratha reservation gr politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 06:48 PM

Topics:  

  • Congress
  • Karad news
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान
1

भाजपकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे, ओबीसींनाच ओपनमध्ये येण्याचे आवाहन करणार; विजय वडेट्टीवार यांचं विधान

आरक्षणाच्या मुद्द्यावर होईना एकमत! मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होताच छगन भुजबळ नाराज
2

आरक्षणाच्या मुद्द्यावर होईना एकमत! मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होताच छगन भुजबळ नाराज

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

सातारा गॅझेटबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचं मोठं विधान, म्हणाले; येत्या महिनाभरात…
4

सातारा गॅझेटबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचं मोठं विधान, म्हणाले; येत्या महिनाभरात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.