मराठा आरक्षणाचा जीआर काढताच ओबीसी नेते आक्रमक
राज्यभरात ओबीसी समाजाचे आंदोलन
ओबीसी समाज कोर्टात दाद मागण्याच्या तयारीत
Chagan Bhujbal: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले होते. त्या आंदोलनाला यश आले आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर मान्य काढला आहे. जरांगे पाटलांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य केल्या आहेत. हैद्राबाद गॅझेटला सरकारने मान्यता दिली आहे. दरम्यान आता या जीआरविरुद्ध ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. ओबीसी समाज आंदोलनाच्या भूमिकेत आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषणे केली जात आहेत. दरम्यान मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका तासात दोन जीआर निघाले, मी कसा गप्प राहू शकतो? असे भुजबळ म्हणाले आहेत.
छगन भुजबळ काय म्हणाले?
मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या जीआरवर भाष्य केले आहे. एका तासात दोन जीआर निघाले. त्यावर शासनाच्या सचिवांची सही आहे. पहिल्या जीआरमध्ये असणारा पात्र हा शब्द दुसऱ्या जीआरमध्ये काढण्यात आला. कारण त्या शब्दावर जरांगे पाटलांनी आक्षेप घेतला होता. दुसऱ्या जीआरमध्ये पात्र शब्द काढला गेला. तर मी गप्प कसा राहू शकतो? मी माझी प्रतिक्रिया देणारच.
कुणबी आणि मराठा या दोन वेगळ्या जाती असल्याचे हायकोर्टाने देखील सांगितले आहे. सामाजिक दृष्टया मागास नसल्याने आरक्षण देता येणार नाही असे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. एका तासात जीआरमध्ये बदल होतो का? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.
जरांगे पाटलांच्या भेटीदरम्यान काय म्हणाले विखे पाटील?
मराठा आरक्षणाच्या जीआर संदर्भात ज्यांना शंका असतील त्यांनी माझ्याशी बोलावे. कोणीही या जीआर संदर्भात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जीआरमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ज्या गोष्टी रेकॉर्डवर आहेत त्या नाकारता येऊ शकत नाहीत. चर्चेत सहभागी होयच नाही, आंदोलनात सहभागी होयच नाही. सरकारने निर्णय केल्यानंतर त्यावर भाष्य करायच, हे थांबवले पाहिजे. मराठा-ओबीसी करण्यापेक्षा ज्या जय लोकांचे जे अधिकार आहे ते आपण द्यायला निघालो आहोत. प्रत्येकाने एकमेकांना सहकारी केले पाहिजे, अशी आमची भावना आहे.