Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवस आयोग झोपला होता का? काँग्रेसचा संतप्त सवाल

निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार सुरु आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 01, 2025 | 02:27 PM
निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवस आयोग झोपला होता का? काँग्रेसचा संतप्त सवाल

निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, कोर्टाच्या निकालानंतर 8 दिवस आयोग झोपला होता का? काँग्रेसचा संतप्त सवाल

Follow Us
Close
Follow Us:
  • निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळण्यात अपयशी
  • निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार
  • हर्षवर्धन सपकाळांची टीका
मुंबई : राज्यातील २४६ नगरपालिका ४२ नगरपंचायतींचे मतदान एक दिवसावर आले असताना २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आश्चर्यकारक व अनाकलनीय आहे. कोर्टाच्या निकालाने या निवडणुका पुढे ढकलल्या असे जर सांगितले जात असेल तर हा निकाल २२ नोव्हेंबरला आला होता मग ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे ८ दिवस निवडणूक आयोग काय झोपा काढत होते काय? असा संतप्त सवाल करून निवडणूक आयोग स्वत:चे नियम पाळू शकत नाही. आयोगाचा भोंगळ कारभार सुरु आहे, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास १० वर्षानंतर होत आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात मात्र त्यातही गोंधळ निर्माण करण्यात आला. आधी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट केली, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ करण्यात आले. दुबार/तिबार नावे मतदार यादीत दाखवली, निवडणुका जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर कोर्टाने निर्देश दिल्याने अनेक नगरपंचायतीमधील भवितव्य टांगणीला लागले आहे आणि आता तर २० नगरपालिका व काही प्रभागांमधील निवडणुका स्थगित करून त्यांचा नवीन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ३ तारखेच्या निकालाचा या निवडणुकावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे ३ तारखेचा निकालही २० तारखेच्या मतदानानंतरच जाहीर करावा. आपलेच नियमही आयोगाला पाळता येत नाहीत हा कसला आयोग? निवडणुका या निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्यच आहे पण निवडणूक आयोगाचा मागील काही वर्षांतील कारभार पाहता आयोगाला निवडणुकाही व्यवस्थित घेता येत नाहीत, हे खेदाने म्हणावे लागते.

सोनिया गांधी व राहुल गांधींवर राजकीय सुडबुद्धीने गुन्हा

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार राजकीय सुडबुद्धीतून केलेला आहे. नरेंद्र मोदी व अमित शाह हे विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेता गैरवापर करत आहेत. नॅशनल हेरॉल्डचे प्रकरण निराधार व कपोल कल्पित आहे. यामध्ये अनेक चौकशा करण्यात आल्या पण काहीही ठोस नाही तरिही केवळ गांधी कुटुंबाला बदनाम करणे त्यांना नाहक त्रास देणे यासाठी मोदी शाह सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून दबावाचे राजकारण करत आहेत. गांधी कुटुंबाचे देशासाठी मोठे योगदान आहे, त्याग व बलिदानाची परंपरा आहे. मोदी, शाह यांच्या दडपशाहीविरोधात लोकशाही व संविधान वाचवण्याचे काम राहुल गांधी करत असल्याने अशी कारवाई केली जात आहे. काँग्रेस अशा कारवायांना भिक घालत नाही. मोदी, शाह यांच्या सुडाच्या राजकारणाचा आम्ही धिक्कार करतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी गुन्हे दाखल करणारे मोदी, शाह यांचे सरकार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हे का दाखल करत नाही, असा सवालही सपकाळ यांनी केला आहे.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has accused the election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 02:26 PM

Topics:  

  • Congress
  • Election News
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा
1

Sangli Politics: सांगली महापालिकेत सत्तेचा पेच! भाजपची डोकेदुखी वाढली; काँग्रेसचा सत्तास्थापनेसाठी मोठा दावा

जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना पत्र
2

जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांसह मुख्यमंत्र्यांना पत्र

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप
3

जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी राजकीय हालचालींना वेग; दौंडमध्ये दोन दिवसात 322 उमेदवारी अर्जाचे वाटप

ईश्वरपूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खंडेराव जाधव बिनविरोध; स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर
4

ईश्वरपूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खंडेराव जाधव बिनविरोध; स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.