Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidyanand Bapat Attack: ‘फडणवीस गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार?’ मारहाणीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आक्रमक

Vidyanand Bapat Attack: पुण्यात ध्वनीप्रदूषण आणि DJच्या वापराविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून सरकारला घेरले आहे.

  • By विवेक
Updated On: Sep 03, 2026 | 04:59 PM
विद्यानंद बापट मारहाणीवरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा

विद्यानंद बापट मारहाणीवरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा

Follow Us
Follow Us:
  • DJ बंदीच्या मागणीवरून विद्यानंद बापटांवर हल्ला
  • हल्लेखोर संतोष चव्हाणला पुणे पोलिसांकडून अटक
  • हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा
 

Vidyanand Bapat Attack: पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी (३ सप्टेंबर) कोथरूड परिसरात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. बापट हे एका मराठी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला मुलाखत देत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. यावरून आता सर्वच स्तरावरून चर्चा होत असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावरून आपली भूमिका मंडळी आहे.

घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत संतोष चव्हाण याला अटक केली. तो कोथरूडमधील राऊतवाडी परिसरातील रहिवासी असून स्थानिक प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.

हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर निशाणा

या घटनेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या व्यक्तीवर अशाप्रकारे हल्ला होणे गंभीर असल्याचे सपकाळ यांनी म्हटले.

Vidyanand Bapad Attack: विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणची मुजोरी अन् विकृत समर्थनाचा प्रयत्न

ते म्हणाले, “पुण्यात DJ बंदीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण होणे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे..! मोदी-फडणवीसांच्या राज्यात सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कोणत्याही जाती-धर्माचा नागरिक सुरक्षित नाही, हे बापट यांच्यावरील हल्ल्याने पुन्हा सिद्ध झाले आहे. आता गृहमंत्री फडणवीस ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतात की हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. गुंडांना संरक्षण देणार की कायद्याचा धाक दाखवणार..? फडणवीसांनी स्पष्ट करावे..!”

पुण्यात DJ बंदीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण होणे, ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक बाब आहे..! मोदी-फडणवीसांच्या राज्यात सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून नागरिकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा कोणत्याही जाती-धर्माचा नागरिक सुरक्षित नाही, हे बापट यांच्यावरील हल्ल्याने… pic.twitter.com/r8i94YhzkA — Harshwardhan Sapkal (@INCHarshsapkal) September 3, 2026

हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई होणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुंडांना संरक्षण मिळणार की कायद्याचा धाक निर्माण केला जाणार, याबाबत फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

हल्लेखोराची आक्रमक प्रतिक्रिया

अटकेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष चव्हाण याने आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप नसल्याचे सांगितले. गणेशोत्सवाबाबत टीका करणाऱ्यांविरोधात अशाच प्रकारे भूमिका घेणार असल्याचे त्याने म्हटल्याचे समोर आले आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

Sharad Pawar on Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर शरद पवारांची प्रतिक्रिया; FDA च्या कारवाईमुळे दूधाच्या दरावर परिणाम?

विद्यानंद बापटांचे प्रत्युत्तर

हल्ल्यानंतर बापट यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. आपण प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अचानक हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गणेशोत्सवासह कोणताही सार्वजनिक सण साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. उत्सव साजरा करण्यास आपला विरोध नसून सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन झाले पाहिजे, हीच आपली भूमिका असल्याचे बापट यांनी सांगितले.

Web Title: Vidyanand bapat attack harshvardhan sapkal reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 04:59 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • pune news

संबंधित बातम्या

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित
1

पानटपरीवाल्याकडून 300 रुपये हप्ता, सिगारेटची पाकीटेही घेतली; खराडीतील पोलीस तडकाफडकी निलंबित

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती
2

राज्यपालांच्या हस्ते ‘वनार्टी’च्या सेवादूत प्रकल्पाचा शुभारंभ; 36 जिल्ह्यांत 72 सेवादूतांची नियुक्ती

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला
3

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण; टिळक रस्त्यावर हल्ला

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
4

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.