Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Tribal Students Protest: आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Nashik Tribal Students Protest : नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकमध्ये स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Sep 01, 2026 | 06:18 PM
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून काँग्रेस आक्रमक; स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठकीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
  • नाशिकमध्ये स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेण्याची मागणी
  • भाजप सरकारच्या आश्वासनांवर हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
 

Nashik Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. नाशिकमध्ये मागील काही दिवसांपासून उपोषण करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विक्रांत भुरिया यांनी भेट घेतली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत काँग्रेसने त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका करत नाशिकमध्ये स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याची मागणी केली. नाशिक विभागात आदिवासी समाजाची मोठी लोकसंख्या असल्याने सरकारने याच ठिकाणी निर्णय घ्यावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

“आदिवासी विद्यार्थी त्यांच्या मागण्यांसाठी १५-२० दिवसापासून उपोषण करत आहेत पण भाजपा महायुती सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. राहुल गांधी यांनी पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपा महायुतीचे सरकार खडबडून जागे झाले व घाईघाईत मागण्या मान्य केल्याचे सांगत आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, त्यांचे आश्वासन म्हणजे लबाडा घरचे जेवण आहे. नाशिक विभागात आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे म्हणून नाशिकमध्ये मंत्रिमंडळाची स्वतंत्र बैठक घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मंजूर कराव्यात,” असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

मोदींचा फोटो हटवल्याने मुंबईत मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा; शिवतीर्थ परिसरात तणावाचे वातावरण, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

‘आदिवासी विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण’

सपकाळ पुढे म्हणाले की, “आदिवासी विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे, आदिवासींच्या योजनेतील पैसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. मागील दोन वर्षात ८९२ आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे, याला फडणवीस सरकार जबाबदार आहे. या विभागातील अनागोंदी कारभार पाहता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा राजीनामा घेतला पाहिजे.”

“भाजपा सरकारने बिंदू नामावलीमध्ये खोडसाळपणा करून आठव्या नंबरवर टाकण्यात आले आहे. जे अन्न मिळते त्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे तो सुधारावा, सेंट्रल किचन तातडीने बंद करावे. अशा त्यांच्या मागण्या आहेत, त्या सर्व मागण्या तातडीने मंजूर करा. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी २ तारखेला नाशिक दौऱ्यावर येत आहेत म्हणून भाजपा सरकार घाईघाईने विद्यार्थ्यांना मागण्या मान्य असल्याचे सांगत आहेत पण त्यावर विश्वास ठेवता येणार नाही,” असेही सपकाळ म्हणाले.

“राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणल्या”

“राहुल गांधी यांनी पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. नाशिक प्रमाणेच पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व राज्यातील इतर ठिकाणीही हे आंदोलन सुरू आहे, या ठिकाणच्या प्रतिनिधींची भेट घेण्याचा आमचा मानस आहे. काँग्रेस पक्षाचा या आंदोलनाला व मोर्चालाही पाठिंबा आहे,” असेही सपकाळ म्हणाले.

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!

“खोटं बोल पण रेटून बोल, ही भाजप व फडणवीसांची शैली”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज अभियानावर आरोप केले, त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “खोटं बोल पण रेटून बोल, ही भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस यांची शैली आहे, त्यांना खोटं बोलण्याचा आजार झाला आहे. म्हणून त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही पण छात्रों की गुंज अभियानामुळे त्यांची झोप उडालेली आहे हे मात्र स्पष्ट दिसत आहे,” असे सपकाळ म्हणाले.

Web Title: Nashik tribal students protest harshvardhan sapkal cabinet meeting demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 06:18 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • Nashik News
  • Rahul Gandhi
  • Student Protest
  • Tribal Community

संबंधित बातम्या

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!
1

Protest Against Rahul Gandhi: राहुल गांधींवरील FIR वरून डेहराडून पेटले; सचिवालयाला घेराव, काँग्रेस कार्यकर्त्यंची पोलिसांशी झटापट!

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला
2

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

Rahul Gandhi FIR Haldwani: राहुल गांधींविरोधात हल्द्वानीत पोलिसांत FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
3

Rahul Gandhi FIR Haldwani: राहुल गांधींविरोधात हल्द्वानीत पोलिसांत FIR दाखल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा
4

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.