Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही, हिम्मत असेल तर…; हर्षवर्धन सपकाळांचं आव्हान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक पदावर महिलेची नियुक्ती करून दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 23, 2026 | 11:10 AM
महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही, हिम्मत असेल तर...; हर्षवर्धन सपकाळांचं आव्हान

महिला आरक्षणावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही, हिम्मत असेल तर...; हर्षवर्धन सपकाळांचं आव्हान

Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतीय जनता पक्षाला महिला आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. भाजपाची विचारसणी ही गोलवलकर यांच्या बंच ऑफ थॉट तसेच मनुस्मृतीवर आधारीत आहे व यामध्ये महिलांना अतिशुद्र समजले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा स्विकार करणाऱ्या मनुवादी विचाराच्या पक्षाने आधी बंच ऑफ थॉट व मनुस्मृतीची होळी करावी व मगच महिला आक्षणावर बोलावे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक पदावर महिलेची नियुक्ती करून दाखवा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

 

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, महिला आरक्षणावर बोलताना भाजपाने महिलांबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन कोणता ते स्पष्ट करावे. सावित्रिबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरु केली, त्यावेळी त्यांच्यावर शेणाचे गोळे मारणारे कोण होते हे भाजपाने सांगावे. सावित्रीबाईंचा या तथाकथीत धर्ममांर्तंडांनी छळ केला, त्यामुळे महिलांबद्दल भाजपा दाखवत असलेला पुळका सर्वांना माहित आहे. संसदेत महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच सर्व पक्षांच्या पाठिंब्याने मंजूर झालेले आहे, १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत मांडले होते ते डिलिमिटेशनचे होते, या विधेयकाआडून भाजपाला देशाचे तुकडे करायचे होते. तर मुंबई व महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा होता. भाजपाचे नेते डिलिमिटेशनवर काहीच बोलत नाहीत. भाजपाचा हा दुष्ट हेतू इंडिया आघाडीने ओळखला व त्या विधेयकाला विरोध केलेला आहे. भाजपा मात्र विरोधी पक्षांना महिला विरोधी ठरवत आहे. महिलांना सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ३३ टक्के आरक्षण दिले नंतर ते वाढवून ५० टक्के केले. महिला आरक्षणाच्या नावावर राजकारण करण्याचे धंदे भाजपाने बंद करावेत, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.

भाजपाच्या धमक्यांना घाबरु नका

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाने वरळीत काढलेल्या मोर्चावेळी एका स्थानिक महिलेने संताप व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन यांना खडेबोल सुनावले. या महिलेने मोर्चाचा त्रास झाला म्हणून संताप व्यक्त केला व ते सर्वजगभर पसरले. आपली नाच्चकी झाली हे लक्षात आल्याने आता भाजपाचे लोक मोर्चाचे वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांनाच धमक्या देत आहेत. हा व्हिडिओ काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरूनही पोस्ट केला, तो काँग्रेसकडून कोठून आला अशी विचारणा करण्यात येत आहे. पण अशा धमक्यांना काँग्रेस घाबरत नाही व पत्रकारांनीही भाजपाच्या धमक्यांना घाबरू नये, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : जय पवार होणार बारामतीच्या भविष्याचा चेहरा; उमेदवारीच्या प्रश्नावर काय म्हणाले अजितदादांचे धाकटे चिरंजीव?

खरगेंच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या विधानाची मोडतोड करून ते दाखवले जात आहे, खरगे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. नरेंद्र मोदी हे ईडी व सीबीआयच्या मदतीने दहशतीचे राजकारण करत आहेत. भाजपाने या विधानावर निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे समजते पण निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल आसाममध्ये निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून काय काय प्रकार केले, त्याकडेही डोळे उघडे ठेवून पहावे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized bjp over womens reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • RSS

संबंधित बातम्या

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
1

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
2

Pune MPSC Student Protest : MPSC पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका
3

‘फॅसिस्ट विचार देशासाठी घातक, संविधान वाचवण्यासाठी पुढे या,’ हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन; भाजपा-आरएसएसच्या विचारसरणीवर सडकून टीका

Mohan Bhagwat : ‘कर्मभूमीशी निष्ठा म्हणजेच खरे हिंदुत्व’; लंडनमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य
4

Mohan Bhagwat : ‘कर्मभूमीशी निष्ठा म्हणजेच खरे हिंदुत्व’; लंडनमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.