Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे. संवादामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याने मोजणी प्रक्रियेला सहमती मिळाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2026 | 05:44 PM
‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही

Follow Us
Follow Us:
  • ‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती
  •  पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही
  • बांधकामे, विहिरी आणि झाडांचे होणार पंचनामे
पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादनाला गती मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आयोजित केलेल्या मोजणीपूर्व ग्रामबैठकांना मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, प्रत्यक्ष जमीन मोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करून चालू बाजारभावानुसार योग्य मोबदला देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. प्रस्तावित ६५ मीटर रुंदीचा मुख्य रस्ता आणि दोन्ही बाजूंस प्रत्येकी ९ मीटरचे सेवा रस्ते असलेल्या या प्रकल्पासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचे धोरण अवलंबले आहे. संवादामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन झाल्याने मोजणी प्रक्रियेला सहमती मिळाली आहे.

 

मुळशी व हवेलीतील मोजणीचे वेळापत्रक

हिंजवडी (मुळशी) : १२ ऑक्टोबर
जांबे (मुळशी) : १३ ऑक्टोबर
मांजरी खुर्द (हवेली) : १३ ऑक्टोबरपासून
मारुंजी (मुळशी) : १५ ऑक्टोबर
कोलवडी (हवेली) : १५ ऑक्टोबरपासून
नांदे (मुळशी) : १७ ऑक्टोबर

हे सुद्धा वाचा : ‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

बांधकामे, विहिरी आणि झाडांचे होणार पंचनामे

कोलवडी येथील बैठकीत बोलताना भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी सांगितले की, जमीन मोजणीनंतर बाधित क्षेत्रातील घरे, झाडे, विहिरी, कूपनलिका आणि पाइपलाइन यांचे सविस्तर पंचनामे केले जातील. मागील तीन वर्षांतील खरेदी-विक्रीचे व्यवहार व चालू बाजारभाव विचारात घेऊन अंतिम मोबदला ठरवला जाईल. दरम्यान, मावळ तालुक्यातील धामणे येथे झालेल्या बैठकीतही शेतकऱ्यांनी मांडलेल्या पर्यायांची प्रशासनाने दखल घेतली आहे. येत्या डिसेंबरअखेर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे पीएमआरडीएचे उद्दिष्ट असल्याची माहिती जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी दिली.

“शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. जमीन मोजणीनंतर चालू बाजारभावाचा विचार करूनच मोबदल्याचे मूल्यांकन होईल. कोणत्याही बाधित शेतकऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही.” — विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. २२)

Web Title: Land acquisition for the inner ring road project has gained momentum nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Farmers
  • PMRDA
  • Ring Road

संबंधित बातम्या

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
1

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
2

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
3

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
4

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.