Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास बदलण्याचा भाजपाचा डाव, प्राण गेला तरी…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

महाराष्ट्रात दर तीन तासाला एक तर दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि त्याला सर्वस्वी नरेंद्र व देवेंद्र यांचे सरकारच जबाबदार आहे, असा घणाघाती ह्ल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 05, 2026 | 11:41 AM
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास बदलण्याचा भाजपाचा डाव, प्राण गेला तरी...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास बदलण्याचा भाजपाचा डाव, प्राण गेला तरी...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा : काँग्रेस आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत केली जात होती. शेतकरी कर्जमाफी करण्यात आली. कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढवली तरी काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात परंतु २०१४ पासून केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. शेतमालाला भाव नाही व दुसरीकडे शेती साहित्य महाग झाल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. महाराष्ट्रात दर तीन तासाला एक तर दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या होत आहेत आणि त्याला सर्वस्वी नरेंद्र व देवेंद्र यांचे सरकारच जबाबदार आहे, असा घणाघाती ह्ल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद अशी शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा काढण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, हनुमंत पवार यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदयात्रेच्या सांगता सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापूस, कांदा, तूर, हरभरा, धानाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल आहे, एकीकडे आस्मानी संकट तर दुसरीकडे सुलतानी संकटात तो अडकला आहे आणि देशातील व राज्यातील भाजपा सरकार मात्र शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. एपस्टिन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचे नाव आहे, त्याच्या जोरावरच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॅकमेल करत आहेत, मोदी अमेरिकेसमोर सरंडर झाले आहेत आणि त्यातूनच अमेरिकेबरोबर नरेंद्र मोदींनी दबावाखाली व्यापारी करार केला, त्याचा मोठा परिणाम भारतातील शेतकऱ्यांवर होणार आहे. या करारामुळे भारतातील शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळणार नाही आणि शेतकरी देशोधडीला लागेल, हे पाप भाजपा सरकारने केले आहे. तर काँग्रेस पक्षाने मात्र शेतकऱ्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे, बळीराजाचे राज्य आणेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असे सपकाळ म्हणाले.

भाजपा व संघ परिवारातील लोक सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करत आहेत. छत्रपतींचा इतिहास विकृत करण्याचे काम केले जात आहे. गोलवलकर, सावरकर यांच्यापासून भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर, कोरटकर यांच्यासारख्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्यांच्यावर कारवाई मात्र केली नाही. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास विरोध करणारे संघ विचाराचे लोक होते, सावित्रीबाईंनाही याच विचाराने विरोध केला, आणि त्याच विचाराचे फडणवीस आज सत्तेत आहेत. परंतु प्राण गेला तरी शिव, शाहु, फुले व आंबेडकरांचा महाराष्ट्र कोणाला बदलू देणार नाही, असा इशारा सपकाळ यांनी दिला.

पाच राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाने महाराष्ट्रात फटाके फोडून विजयाचा जल्लोष केला, राज्यात तर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या होत आहे, महिलांवर दररोज अत्याचार होत असताना फटाके फोडून जल्लोष करताना भाजपाला लाज कशी वाटत नाही, असा संतप्त सवाल करत ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भाजपाने सर्वशक्ती पणाला लावली. निवडणूक आयोग व सुप्रीम कोर्टही मैदानात उतरले आणि सर्वांनी मिळून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव केला असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; महापौरांच्या फोटोमुळे सोशल मीडियावर संताप

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has made serious allegations against bjp 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
1

भाजप सरकारला परीक्षाही घेता नाहीत; NEET पेपरफुटी प्रकरणावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल
2

“ही केवळ नाकामी नाही, तर तरुणांच्या भविष्याशी केलेला गुन्हा!”; NEET परीक्षा रद्द झाल्याप्रकरणी राहुल गांधींचा तीव्र हल्लाबोल

Nana Patole on PM Narendra Modi: “उपदेश देण्यापूर्वी स्वतःच्या…!” नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल
3

Nana Patole on PM Narendra Modi: “उपदेश देण्यापूर्वी स्वतःच्या…!” नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल

Rohit Pawar: “आधी तुमची उधळपट्टी थांबवा मग जनतेला सांगा!”; पंतप्रधान मोदींच्या ‘बचत’ मंत्रावर रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल
4

Rohit Pawar: “आधी तुमची उधळपट्टी थांबवा मग जनतेला सांगा!”; पंतप्रधान मोदींच्या ‘बचत’ मंत्रावर रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.