Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप अन् RSSचे राष्ट्रीय धोरण, त्यांना…; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा, आरएसएस व धिरेंद्र शास्त्रीचा खरपूस समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 25, 2026 | 04:22 PM
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप अन् RSSचे राष्ट्रीय धोरण, त्यांना...; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजप अन् RSSचे राष्ट्रीय धोरण, त्यांना...; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

Follow Us
Follow Us:

मुंबई : भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा अशास्त्री बरळला तरीही त्यावर या तिघा नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण असून महाराजांचे विचार व कर्तृत्व त्यांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, महाराजांचा अपमान केल्याबद्दल धिरेंद्र शास्त्री, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी व मोहन भागवत यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा, आरएसएस व धिरेंद्र शास्त्रीचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्या विचारांनी देशाला व महाराष्ट्राला दिशा दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे विचारच संविधानातही आहेत. हाच विचार व छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व भाजपा व रा. स्व. संघाला मान्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्याने बदनामी करणे, त्यांचा अपमान करणे व महाराजांच्या इतिहासाची विकृत मांडणी करणे हे भाजपा व रा. स्व. संघाचे राष्ट्रीय धोरण आहे. काळी टोपीवाला भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, छिंदम, या भाजपाच्या पिलावळीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकली पण त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तर जय भगवान गोयल या भाजपा नेत्याने ‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’, नावाचे पुस्तक लिहून महाराज व मोदींची तुलना केलेली आहे, याचा संताप जनतेमध्ये आहे.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक लिखाण आहे. सावरकर यांनीही ‘सात सोनेरी पाने’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्लदल घाणेरडे व विकृत लिखाण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत त्यांच्याबद्दल भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री अपमानकारक बोलत असताना फडणवीस, गडकरी व मोहन भागवत यांना लाज वाटायला हवी होती, त्यांनी त्याला थांबवले पाहिजे होते. राज्यभरात या विरोधात तीव्र संताप आहे. शिवाजी महाराजांबद्दल अशी अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या लोकांवर सरकार कारवाई करत नसल्यान चुकीचा संदेश जात आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा : सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस, चार आयएएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करणार; नाना पटोलेंचा इशारा

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has made serious allegations against bjp and rss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.