Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवेंद्र फडणवीस नवं पुण्याचे शिल्पकार’ झाल्यापासून पुण्यात दररोज एक बलात्कार; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

दररोज एक बलात्कार होत आहे. ड्रग्जचा खुलेआम धंदा सुरु आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात गुंडांचा हस्तक्षेप वाढला आहे, याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत का? असा संतप्त प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 07, 2026 | 05:49 PM
‘देवेंद्र फडणवीस नवं पुण्याचे शिल्पकार’ झाल्यापासून पुण्यात दररोज एक बलात्कार; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

‘देवेंद्र फडणवीस नवं पुण्याचे शिल्पकार’ झाल्यापासून पुण्यात दररोज एक बलात्कार; हर्षवर्धन सपकाळांचा आरोप

Follow Us
Follow Us:

पुणे : ‘नवं पुण्याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस’, असे पोस्टर्स व बॅनर्स पुणे शहरात जागोजागी झळकवण्यात आले त्याच पुणे शहरात महिलांवरील लैंगिक अत्याचार वाढले आहेत. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात लैंगिक शोषणाची ७०० प्रकरणे घडली आहेत. दररोज एक बलात्कार होत आहे. ड्रग्जचा खुलेआम धंदा सुरु आहे. कोयता गँगचा हैदास सुरु आहे. गुलटेकडी मार्केट यार्डात गुंडांचा हस्तक्षेप वाढला आहे, याचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत का? असा संतप्त प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

 

पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक प्रशांत जगताप यांच्या संकल्पनेतून संविधान चौक, वानवडी येथे उभारलेल्या ४५ मीटर ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा तसेच काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित राहून कॉंग्रेस पक्ष व तिरंगा राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी कॉंग्रेस पक्षाने दिलेले योगदान तसेच इतर विषयांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पुणे कॉंग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, खजिनदार अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरूवात नसरापूर, पुणे येथील ४ वर्षीय पीडित बालिका आणि महिला व बाल अत्याचारातील अन्य पीडितांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, जगात आज एपस्टिन फाईलने धुमाकुळ घातला आहे. लहान व कोवळ्या वयातील मुला मुलींचे लैंगिक शोषण करुन, त्यांच्या हत्या करण्यात आल्याचे यातून उघड झाले आहे. विकृतीचा अत्यंत घाणेरडा व किळसवाणा हा प्रकार असून, यामुळे जगात भूकंप आला आहे. जगभरातील अनेक मोठ्या पदावरील व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत. याच एपस्टिन फाईलमध्ये भारतातील दोघांची नावे आहेत, एक आहेत केंद्रीय मंत्री हरदिप पुरी तर दुसरे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. नरेंद्र मोदी इस्त्रायलमध्ये जाऊन नाचले अशी माहिती समोर आली आहे. ही एपस्टिन फाईल उघड झाल्यापासून नरेंद्र मोदी अत्यंत दबावात काम करत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी अचानक युद्धबंदीची घोषणा अमेरिकेने केली. अमेरिकेबरोबर दबावाखाली व्यापार करार करावा लागला. कच्चे तेल रशियाकडून घ्यायचे नाही, हे अमेरिका भाराताला सांगत आहे आणि नरेंद्र मोदी मात्र काहीही न बोलता गप्प आहेत, कारण नरेंद्र सरेंडर झाले आहेत. एपस्टिन फाईल्ससारखे बाल लैंगिक शोषणाचे प्रकार महाराष्ट्रातही वाढत आहेत, हा काय योगायोग आहे? अशी विचारणा सपकाळ यांनी केली आहे.

आपला राष्ट्रीय ध्वज तिरंग्यासाठी हजारो लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या पण तिरंग्याचा अपमान होऊ दिला नाही. या तिरंग्यातील भगवा रंग हा त्यागाचे प्रतिक आहे. पांढरा रंग प्रकाश व सत्याचे प्रतिक आहे, तर हिरवा रंग हा सुजलाम सुफलाम म्हणून घेतला आहे तर अशोक चक्र हे गतीमानतेचा प्रतिक आहे. या तिन्ही रंगाचा कार्यकारणभाव भाजपा व रा. स्व. संघ मोडू पहात आहे. संघाने तिरंग्याला विरोध करत स्वातंत्र्यानंतर जवळपास ५०-५५ वर्षे रा. स्व. संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही, अशा प्रवृत्तीविरोधात उभे ठाकले पाहिजे. आपली लढाई तिरंगा विरोधात काळ्या टोपीची आणि संविधान विरोधात मनुवादाची लढाई आहे, असे सपकाळ म्हणाले.

पुण्यात ३४ हजार कोटी रुपयांचे ५४ किलोमिटरचे भूमिगत रस्ते प्रकल्प आखण्यात आले आहेत. यात मोठा भ्रष्टाचार आहे. हा प्रकल्प जाहीर करताना कोणतीही जनसुनावणी घेण्यात आलेली नाही, नगरसेवकांना विचारात घेतले नाही. हा प्रकल्प पुण्यात भ्रष्टाचाराची पाळंमुळं रोवणारा आहे, त्याच्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : सुरक्षा व्यवस्था की कार्यकर्त्यांचे पुनर्वसन? नवनियुक्त नगरसेवकांचा आपलीच माणसे भरण्यासाठी प्रशासनावर दबाव

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has made serious allegations against chief minister devendra fadnavis in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • pune news

संबंधित बातम्या

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार
1

MPSC विद्यार्थ्यांचे ‘या’ तारखेपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि विश्वजीत कदमही सहभागी होणार

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक
2

‘श्रीमंतां’चा थाटच न्यारा! ढोल-ताशांचा गजर, ‘मोरया’चा जयघोष अन्…; ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
3

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
4

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.