Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले : हर्षवर्धन सपकाळ

अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना सपकाळ यांनी व्यक्त केल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 29, 2026 | 12:46 PM
अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले : हर्षवर्धन सपकाळ

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले : हर्षवर्धन सपकाळ

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, २८ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. विमान लॅडींग करण्याच्या प्रयत्न असताना हा अपघात झाला. ज्यामध्ये अजित पवार, पायलट कॅप्टन सुमित कपूर, सह-पायलट शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र सरकारने तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व सुन्न करणारी आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजित दादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित दादा पवार यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे काका, ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्याकडून मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत अजित दादांनी राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. कामाच्या बाबतीत ते अत्यंत स्पष्ट, वक्तशीर, कणखर आणि निर्णयक्षम भूमिका घेत असत. कोणत्याही पक्षातील कार्यकर्ता असो, त्याच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असत.

आपल्या राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी आमदार, खासदार, विविध खात्यांचे मंत्री तसेच उपमुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आणि प्रत्येक पदाला त्यांनी पूर्ण न्याय दिला. राजकारणासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, सहकार, कला व क्रीडा क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. बारामतीसह पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करून त्यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवला. सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत, हीच त्यांची कायम भूमिका होती. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.

अजित दादा पवार यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी संस्थात्मक बांधणी केली, नेतृत्वाची पुढील पिढी घडवली आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकासावर विशेष भर दिला. विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी राजकीय हानी झाली आहे. स्व. विलासराव देशमुख, गोपीनाथ जी मुंडे यांच्याप्रमाणेच अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्राने एक उत्तम नेता गमावला; अजित पवार यांच्या निधनाबद्दल रमेश चेन्निथला यांचा शोकसंदेश

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has reacted after the death of deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • ajit pawar plane crash
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

प्रशासनावर मजबूत पकड अन्…; अजित पवारांच्या निधनानंतर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रीया
1

प्रशासनावर मजबूत पकड अन्…; अजित पवारांच्या निधनानंतर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रीया

Baramati Accident : फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव निवासस्थानी दाखल! अडीच वर्षांचा संसार मोडला
2

Baramati Accident : फ्लाइट अटेंडंट पिंकी माळीचे पार्थिव निवासस्थानी दाखल! अडीच वर्षांचा संसार मोडला

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा
3

Ajit Pawar Plane Crash: “…पान भर जाहिराती दिल्याने काय होणार?”; राऊतांचा भाजपवर निशाणा

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात: पुणे पोलिसांकडून ‘एडीआर’ दाखल, तपास सीआयडीकडे
4

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात: पुणे पोलिसांकडून ‘एडीआर’ दाखल, तपास सीआयडीकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.