Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त खोटारडेपणा व चॉकलेटच दिले, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 24, 2025 | 12:48 PM
काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो; भाजपाने मात्र...; हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो
  • भाजपाने मात्र खोटारडेपणा व चॉकलेटच दिले
  • हर्षवर्धन सपकाळांची टीका
मुंबई : काँग्रेस पक्षाने ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न काही लोक विचारत असतात. काँग्रेस पक्षाने रोजगार दिला, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, औद्योगीकरण, तंत्रज्ञानासह चौफेर विकास केला. काँग्रेसने ७५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब लिहिण्यास बसलो तर कागद संपतो पण भाजपाने काय दिले याचा हिशोब केला तर फक्त खोटारडेपणा व चॉकलेटच दिले, असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. यावेळी खासदार रवींद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील, नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, सुरेंद्र घोडसकर, तिरुपती पाटील कोंढेकर, सुरेश दादा गायकवाड, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष बालाजी गाडे, भारतीताई पवार, रेखाताई चव्हान, तौसिफ इनामदार, आदिनाथ चिंताकुटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशाच्या विकासात काँग्रेसचे मोठे योगदान आहे ते कोणीही नाकारू शकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत विकासाची शिखरे काँग्रेस सरकारने गाठली. पण २०१४ पासून सत्तेत आलेल्या भाजपाने काय दिले, तर फक्त खोटी आश्वासने दिली. नोटबंदी केली पण काळा पैसा बाहेर आला नाही, अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत फक्त सर्वसामान्य जनतेला त्रास झाला. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्तपन्न दुप्पट करणार हे सर्व हवेतच विरून गेले. नरेंद्र मोदींच्या राजवटीत अदानी व अंबानी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी अशी परिस्थिती आहे.

काँग्रेस पक्षाने भोकरला खूप काही दिले. आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण भोकरला आल्यावर मात्र… नाम बडे और दर्शन खोटे, अशी परिस्थिती होती, अशा लोकांचा इतिहास विसरू नका. भोकरचे ते डरपोक लोक मोदींच्या कळपात जाऊन बसले, ‘जो डर गया ओ मर गया’, त्यांनी गद्दारी केली, पळून गेले आता शेठ, सावकारांचे राज्य नको, जनतेचे राज्य हवे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जाणते नेतृत्व आहेत, त्यांनी राज्याच्या विकासासाठी, समाजकारणासाठी आपली हयात खर्ची घातली, वैचारिक मतभेद असू शकतात पण आज सत्ताधारी पक्ष त्यांना त्रास देत आहे, ते अशोभनीय आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडला, बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडला. पूर्वी पोरं चोरणारी टोळी होती आता भाजपा हा पक्ष फोडणारी टोळी बनली आहे, याचा धिक्कार करतो असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has strongly criticized the bjp 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 12:48 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा
1

Political News: राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का, ‘या’ बड्यानेत्याने हाती घेतला भाजपचा झेंडा

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
2

भाजप बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव, बेटी पढाव नाही तर…; हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद
3

Navi Mumbai Election : पनवेलकरांचा भाजपाला दणदणीत पाठिंबा; सरस्वती काथारा यांना मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध
4

Pune Election : भाजपच्या सभेला नागरिकांचा प्रतिसाद! प्रभाग 09 साठी जाहीरनामा प्रसिद्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.