Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता MPSC चाही पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबवा, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

पेपरफुटीने लाखो विद्यार्थी व पालकांच्या आशा आकांशावर बुलडोझर फिरवला जात असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला हा खेळ थांबला नाही तर भाजपाला महागात पडेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2026 | 04:21 PM
आता MPSC चाही पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबवा, नाहीतर...; काँग्रेसचा इशारा

आता MPSC चाही पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबवा, नाहीतर...; काँग्रेसचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीचेच भविष्य अंधारात लोटण्याचे महापाप भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. भाजपा सरकारच्या काळात पेपरफुटीचे ग्रहण लागले आहे. नीट पेपरफुटीनंतर राज्यात टीईटीचा पेपर फुटला आणि आता MPSC च्या औषध निरीक्षक (Drug Inspector) भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच WhatsApp वर फिरल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. भाजपा सरकारला एक परीक्षाही व्यवस्थित घेता येत नाही, पेपरफुटीने लाखो विद्यार्थी व पालकांच्या आशा आकांशावर बुलडोझर फिरवला जात असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला हा खेळ थांबला नाही तर भाजपाला महागात पडेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

 

भाजपा सरकारवर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पेपरफुटीने पाणी फेरले आहे. सरकार व सरकारी यंत्रणा मात्र टोलवाटोलवी करत आहे. यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयाचे गांभिर्य राहिलेले नाही. पेपरफुटी, निकालातील घोटाळे, गुणांतील गैरव्यवहार आणि अधिकृत तक्रारींसह पुरावे समोर आले तरीही सरकार आणि यंत्रणा शांतच आहेत. टीईटी निकालातील गडबड समोर येऊनही सरकारी यंत्रणा मात्र असे काही झालेच नाही असे म्हणत आहे, एमपीएससीकडूनही पेपरफुटीवर गोलमाल स्पष्टीकरण दिले जात आहे, हा तरुणांचा व पालकांवरचा अन्याय आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले जात आहे, हीच या भ्रष्ट, निष्क्रिय सरकारची कार्यपद्धती आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे. पेपरफुटीचे रॅकेट कोणाच्या वरदहस्ताखाली चालू आहे? सरकार मधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने हे उद्योग सुरू आहेत? याची उत्तरे फडणवीस सरकारला द्यावी लागतील. विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी कराल तर हीच तरुणाई तुम्हाला खूर्चीवरून खाली खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

घोटाळेबाज भाजपाचे नेते

भाजपाच्या चेलेचपाट्यांनी शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडला आहे. १६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात भाजप नेता संजय गरुड ला अटक झाली आहे. यावरून घोटाळेबाज कोण आहेत हे स्पष्ट होते. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे ८४१ शिक्षक व कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नोंद करून शासनाची तब्बल १६० कोटींची फसवणूक करण्यात आली असून अटक झालेला आरोपी भाजपाचाच नेता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तरुणाईचे आयुष्य बरबाद केले आहे असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : महापालिका किती काळ चालवणार ‘पीएमपी’? दहा तास चालली नुसतीच चर्चा; नगरसेवकांच्या टीकेनंतर…

तीन वर्षात राज्यातील 28,764 उद्योग बंद

एकीकडे शिक्षण क्षेत्राचा बट्याबोळ केला असून दुसरीकडे उद्योगक्षेत्राचीही वाट लावलेली आहे. महाराष्ट्रातील लघु व मध्यम उद्योगांना टाळे लागले आहे. 2023 ते 2026 या तीन वर्षात महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरूपाचे 28,764 उद्योग बंद झाले आहेत. देशात सर्वात जास्त MSME उद्योग महाराष्ट्रात बंद पडले आहेत. उद्योग बंद होण्यामागे खुल्या बाजारातील आव्हाने, प्रचंड वाढलेला उत्पादन खर्च, वित्तपुरवठ्याच्या अडचणी आणि भ्रष्ट-प्रशासन व गुंडागर्दी ही कारणे आहेत. उद्योग बंद झाल्यामुळे कोट्यवधी नोकऱ्या आणि रोजगारांवर गदा आली आहे. शिक्षणाचा बाजार, पेपरफुटी यातून सावरले तरी नोकऱ्या मिळतील याची शाश्वती राहिलेली नाही, हे तरुणाईसाठी अत्यंत चिंताजनक असून या सर्वाला भाजपा सरकारचे धोरणच जबाबदार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has warned the government over the paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत
1

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
2

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
4

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.