Photo Credit- Social Media काँग्रेस नेत्या हेमलता पाटील राजीनामा देणार
नाशिक: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्य निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. येत्या तीन-चार महिन्यात महापालिकेच्या निवडणुका लागतील, असे संकेत मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेस वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसातचं त्या राजीनामा देतील अशी माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीपासूनच हेमलता पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करूनही आपल्यावर अन्याय झाला. पक्ष नेतृत्त्वानेही आपल्याकडे दुर्लक्ष केलं. एकमेकांच्या कापाकापीतच नेते मश्गुल असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांवर केला. तसेच, काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षात जायचं याचाही निर्णय येत्या दोन दिवसात त्या घेणार आहेत.
भारतीय संस्कृतीचा जागतिक स्तरावर जयघोष; महाकुंभाबाबत ‘या’ इस्लामिक देशांनी केलं
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यची जागा ठाकरे गटाला मिळाली. तेव्हापासूनच त्या नाराज होत्या. तरीही निवडणुकीच्या वेळी बंडखोरी करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. पण काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी फोनवरून संपर्क करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. तरीही त्या निर्णयावर ठाम होत्या. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 4 नोव्हेंबरला त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यापूर्वी त्यांनी फेसबूक पोस्ट करून आपल्या मनातील खद्खद व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक फेसबूक पोस्ट केली होती. यात ‘भावी राजकीय वाटचालीसाठी तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा,’ असं त्यांनी म्हटलं होतं. “जेंव्हा तुमची निष्ठा तुमचा प्रामाणिकपणा ही तुमची कमजोरी समजली जाते. तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेंव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे अशा विचारा प्रती मी आता पोहचलेय. तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का? अपेक्षा आहे भावी वाटलाची साठी आपल्या अशिर्वादाची” असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिल आहे.
कार्तिक आर्यनच्या चित्रपटात ‘ये जवानी है दिवानी’ कलाकारांचा कॅमिओ? करण जोहर चाहत्यांना