Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आणखी किती मृत्यू होण्याची वाट पाहणार; नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

राज्य सरकार मात्र GBS आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2025 | 03:05 PM
आणखी किती मृत्यू होण्याची वाट पाहणार; नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

आणखी किती मृत्यू होण्याची वाट पाहणार; नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने ८ मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडू लागले आहे परंतु राज्य सरकार मात्र या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, जीबीएसचा पहिला रुग्ण ९ जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास १७० ते १७५ रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे, यामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील ५० रुग्ण आयसीयुमध्ये असल्याचे समजते. काल मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या पण त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाययोजना केल्या आहेत का? जीबीएसच्या रुग्णाला द्यावे लागणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत २० हजार रुपये आहे असे समजते. एवढ्या किंमतीचे इंजेक्शन सर्वसामान्यांना परवडणारे नाही. राज्य सरकारने त्यासाठी काही तरतूद केली आहे का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील, असे नाना पटोले म्हणाले.

जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला त्याचवेळी आम्ही सरकारला जागे केले होते पण सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास फारसा वेळ आहे असे दिसत नाही. राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहे, काय उपाययोजना केल्या, खबरदारी काय घ्यावी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिराबाजी केली जाते पण जीबीएस सारख्या गंभीर आजाराच्या जनजागृतीसाठी व उपाय योजनांसाठी सरकार पैसा खर्च करत नसेल तर राज्याचे दुर्दैव आहे असेही नाना पटोले म्हणाले.

नायर रुग्णालयात एकाचा मृत्यू

सध्या महाराष्ट्रातगुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही या आजाराचे थैमान पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत जीबीएस या आजाराने शिरकाव केला होता. त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच आता मुंबईतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईत जीबीएस आजारामुळे पहिला बळी गेला आहे. वडाळ्यात राहणाऱ्या एका 53 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Web Title: Congress leader nana patole has made serious allegations against the state government nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • GBS
  • Hospital
  • Maharashtra Goverment
  • Nana patole

संबंधित बातम्या

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड
1

फडणवीसांच्या दौऱ्यात धांदल! सरकारी ध्वज, पाट्या, बॉडीगार्ड… ‘खोटा अधिकारी’चा मोठा थाट, डीसीपींच्या शंकाळू नजरेमुळे गजाआड

Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!
2

Thane News : उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात प्रशासनाची धडक कारवाई; औषधांच्या पाकिटात आढळून आली दारू!

धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अमिताभ बच्चन एकटेच निघाले; चाहते म्हणाले, ”जय-वीरूची भेट”
3

धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अमिताभ बच्चन एकटेच निघाले; चाहते म्हणाले, ”जय-वीरूची भेट”

४५ वर्षांनंतर, धर्मेंद्र यांच्या दोन्ही बायका समोरासमोर येतील का? ही-मॅनवर घरीच होणार उपचार
4

४५ वर्षांनंतर, धर्मेंद्र यांच्या दोन्ही बायका समोरासमोर येतील का? ही-मॅनवर घरीच होणार उपचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.