Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हैदराबाद गॅझेटला महाराष्ट्र सरकार अनुकूल, मग तेलंगणाप्रमाणे…; काँग्रेसचा सवाल

तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 04, 2025 | 05:32 PM
काँग्रेसमध्ये गटबाजी नाही; जिल्ह्यात केवळ मुलाखतीच घेतल्या; प्रदेशाध्यक्षांचा यू-टर्न

काँग्रेसमध्ये गटबाजी नाही; जिल्ह्यात केवळ मुलाखतीच घेतल्या; प्रदेशाध्यक्षांचा यू-टर्न

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढला आहे. सरकार जर हैदराबाद गॅझेट लागू करणार आहे तर मग तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

आरक्षणाच्या मुदद्यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर असून, सध्या मराठा व ओबीसी समाजात आरक्षणावरून वाद सुरु झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या त्यांच्या मागणीसाठी महायुती सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन आदेश काढला आहे. मुळात देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दावर विश्वास किती ठेवायचा हाच खरा प्रश्न आहे कारण त्यांच्या अशा अनेक घोषणा नंतर जुमलेबाजी ठरल्या आहेत. आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी चर्चा असताना सरकार मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का लावलेला नाही असे सांगत आहेत. जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळणार असेल तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही या सरकारच्या दाव्यावरच प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्हीपैकी एक बरोबर असू शकते दोन्हीही बरोबर कसे, हे सरकारने स्पष्ट केले पाहिजे. कारण सरकारच्या भूमिकेमुळे दोन्ही समाजात संभ्रम निर्माण झालेला आहे.

भाजपा युती सरकारला आरक्षणाच्या नावाखाली समाजा समाजात भांडणे लावायची आहेत. आज महाराष्ट्रात तेच चित्र दिसत आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचे जाहिर केल्याने ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका कायम आहे. आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच रामबाण उपाय आहे. पण भाजपा सरकार मात्र त्याबाबत फारसे अनुकुल दिसत नाही. केवळ जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करून उपयोग नाही, तर त्याची अंमलबजावणी करावी तरच आरक्षणाच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघू शकतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

ओबीसी समाज आक्रमक

मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसीचे आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. ओबीसी समाजाच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी बारामतीत एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी हा मेळावा होणार असून, पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी बांधव या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, ॲड मंगेश ससाणे, मृणाल ढोले हेही उपस्थित राहणार असून, या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Congress party has questioned the government on maratha and obc reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Sapkal
  • Mahayuti Goverment

संबंधित बातम्या

‘राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा’; मोदी, RSS आणि ट्रस्टवर हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी
1

‘राम मंदिरातील देणग्यांवर दरोडा’; मोदी, RSS आणि ट्रस्टवर हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप, निष्पक्ष चौकशीची मागणी

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
2

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
3

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन
4

देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी लढाई, देशासमोरचा धोका लक्षात घेऊन संघर्षाची तयारी ठेवा; सपकाळांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.