Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्…

मध्यप्रदेशातील २३ वर्षीय विवाहितेला मनमाडला सोडण्याचे आमिष दाखवून दोन जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 21, 2026 | 04:18 PM
संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्...

संतापजनक! विवाहित महिलेला दोघांनी दुचाकीवर बसवले, नंतर घरात नेऊन दारु पाजली अन्...

Follow Us
Follow Us:

वैजापूर : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. मध्यप्रदेशातील २३ वर्षीय विवाहितेला मनमाडला सोडण्याचे आमिष दाखवून दोन जणांनी सोबत नेले. त्यानंतर तिला मद्य पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे देवचंद अशोक भागवत (वय ३५, रा. गवंडगाव, ता. येवला, जि. नाशिक; सध्या रा. पाटील गल्ली, वैजापूर) आणि किरण अशोक पेटारे (वय ४०, रा. वाकला, ता. वैजापूर; सध्या रा. वानवाडी, वैजापूर) अशी आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, ती पतीसोबत मजुरीचे काम करते.

मनमाडला सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवले

मनमाडला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असताना दोन्ही आरोपी तिच्याजवळ आले. त्यांनी मनमाडला सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर ती त्यांच्या दुचाकीवर बसली. रस्त्यात पाऊस सुरू झाल्याने आरोपी तिला गवंडगाव येथील एका घरात घेऊन गेले. तेथे तिला मद्य पाजल्यानंतर दोघांनी तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

पोलिस कर्मचाऱ्यांनी घेतली दखल

घटनेनंतर पीडिता रडत असताना परिसरात आढळली. पोलिस कर्मचारी योगेश झाल्टे, अजित नाचन आणि दत्तात्रय रंधे यांनी तिची चौकशी करून तिला वैजापूर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना अल्पावधीत ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास वैजापूर पोलिस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

कॉलेज तरुणीवर चार मित्रांकडून वारंवार लैंगिक अत्याचार

पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करायची धमकी देखील देण्यात आली आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरून वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: The police have detained two men for outraging the modesty of a married woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात
1

विद्यार्थ्याचे अपहरण करून लुटले, पोलिसांकडून टोळीचा काही तासांतच पर्दाफाश; तिघांना घेतले ताब्यात

साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक
2

साईंच्या दारात महिलेवर वार, गेट क्रमांक चारजवळील खुनाने शिर्डी हादरली; 2 महिलांना अटक

धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला
3

धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला

सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त
4

सातारा तालुका पोलिसांची धडक कारवाई; कंटेनरमधून तब्बल 1.98 कोटींच्या बनावट गोवा दारूचा साठा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.