Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… हे तर सरकारने घेतलेले बळी”; पुण्यातील दुर्घटनेवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका

कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेबाबत सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2025 | 02:35 AM
"... हे तर सरकारने घेतलेले बळी"; पुण्यातील दुर्घटनेवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका

"... हे तर सरकारने घेतलेले बळी"; पुण्यातील दुर्घटनेवर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची टीका

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

इंद्रायणी पुल दुर्घटनेवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कुंडमळा येथील लोखंडी पुल कमकुवत झाला होता, त्याच्यासाठी वर्षभरापूर्वी निधीही मंजूर केल्याचे सरकार सांगत आहे. मग वर्षभर काम का झाले नाही? सरकार दुर्घटना होण्याची वाट पहात बसले होते का? त्या पुलावर ‘पाटी’ लावली होती असे प्रशासन सांगत आहे पण अशा पाट्या लावून ‘पाट्या’ टाकण्याचेच काम शासन व प्रशासन करत आहे. ५५ पर्यटक वाहून गेले, त्यातील अनेकांना वाचवण्यात आले, पण चार जण ठार झाले तर सहा गंभीर जखमी झाले, याला जबाबदार कोण? मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये दिले म्हणजे सरकारची जबबादारी संपत नाही. जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणीही गांभिर्याने घेणार नाही व अशा दुर्घटना होऊन निष्पाप लोक मात्र मरत राहतील.

पुल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा आहे. दुर्घटना होतात, लोक मरतात आणि सरकार काही पैसे तोंडावर फेकून ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखे पुन्हा तेच होत रहाते, हे दुष्टचक्र थांबले पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

कुंडमळा दुर्घटनेची सखोल चौकशी; अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेबाबत सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले. दरम्यान दुर्घटनेसंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे माहिती मिळाल्यानंतर केवळ वीस मिनिटांमध्ये मदत कार्यास सुरुवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
कुंडमळा येथे झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत ५० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याचे डूडी यांनी सांगितले. तसेच जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, बहुतांश जखमी धोक्याबाहेर आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नाही, असेही डूडी म्हणाले.

 

Web Title: Congress president harshwardhan sapkal criticizes to mahayuti goverment kundmala bridge collasped accident maval news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Harshwardhan Sapkal
  • maval news
  • Pune
  • Pune Accident

संबंधित बातम्या

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला
1

Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल
2

मोठी बातमी! ‘परवानगी नसताना वाहनांवर…’; अजित पवारांच्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन
3

Crime News: तडीपार गुंडाकडे पोलिसांचे दुर्लक्ष! हिंमत एवढी की महिलेचा केला बलात्कार, पोलीस कॉन्स्टेबलचे निलंबन

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात
4

Pune Politics: पुणे महापालिकेचा राजकीय पेच वाढणार! ‘आप’, ‘वंचित’ आणि ‘एमआयएम’ निवडणुकीच्या रिंगणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.