Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळ हे मिनी पाकिस्तान…अतिरेक्यांच्या पाठिंब्यामुळे गांधी खासदार; नितेश राणेंच्या वक्तव्यामुळे युवक कॉंग्रेस आक्रमक

मंत्री नितेश राणे यांनी कॉंग्रेस खासदार प्रियांका गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यानंतर काँग्रेस प्रदेश सरचिटणीस रोहन-सुरवसे पाटील आक्रमक झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 01, 2025 | 04:28 PM
Congress state general secretary Rohan-Suravase Patil's complaint on Nitesh Rane's statement

Congress state general secretary Rohan-Suravase Patil's complaint on Nitesh Rane's statement

Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अनेक वादग्रस्त विधाने समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधी नेत्यांनी अनेक वादग्रस्त आणि धक्कादायक विधाने केले आहे. आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. राज्याचे मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी सासवड येथे आयोजित एका कार्यक्रमात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी व वायनाडच्या खासदार, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याबाबत बोलताना केरळ या राज्याची तुलना थेट पाकिस्तानशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान असून खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. केरळ मधील अतिरेकी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना मतदान करतात. अतिरेक्यांच्या पाठिंब्यामुळे गांधी खासदार होतात, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे. राणेंच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मंत्री नितेश राणे यांच्यावर प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा अश्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले. याप्रसंगी पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, काँग्रेस कार्यकर्ते सचिन मोरे, बाबा मिसाळ हे उपस्थित होते.

महाराष्ट्रासंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात रोहन सुरवसे पाटील म्हणाले की, “देशाची एकता, सहिष्णूता आणि अखंडतेला बाधा निर्माण करणारे विभाजनकारी, धार्मिक द्वेष पसरवणारे प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या, संविधानचा अपमान करणाऱ्या नितेश राणे यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कडून केली आहे.”

राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देशातील सर्वात जास्त साक्षर असणाऱ्या राज्याची तुलना आपल्या देशाचा शत्रू असणाऱ्या पाकिस्तान या राष्ट्राशी करत केरळ मधील लोकांना दहशतवादी म्हणणे हा लोकशाहीचा, संविधानाचा व केरळातील नागरिकांचा घोर अपमान आहे. असेही सुरवसे पाटील म्हणाले.

नितेश राणे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते मा.राहुल गांधी, खासदार मा.प्रियांका गांधी तसेच त्यांना निवडून देणाऱ्या समस्त जनतेचा आणि केरळ या राज्याचा अपमान केला आहे. हा संविधानातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणवल्या जाणाऱ्या मूल्यांवर व सिद्धांतांवर हल्ला असून भारतीय राज्यघटनेची पायमल्ली आहे. केरळ राज्यातील नागरिकांचा हा घोर अपमान आहे, अशी प्रतिक्रिया पुणे शहर व जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे यांनी दिली.

Web Title: Congress state general secretary rohan suravase patils complaint on nitesh ranes statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Congress
  • Nitesh Rane
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला पुन्हा धमकी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून तपास सुरू
1

बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला पुन्हा धमकी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पोलिसांकडून तपास सुरू

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल
2

‘उमेदवारी अर्ज रद्द करणे म्हणजे लोकशाहीवर अन्याय’; ‘स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईची गरज’, हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी
3

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
4

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.