Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

टीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकारविरोधातील आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. युवक काँग्रेसने सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर निदर्शने करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 30, 2026 | 08:45 PM
TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

TET पेपरफुटीवर काँग्रेस आक्रमक; सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाबाहेर आंदोलन, दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

Follow Us
Follow Us:

टीईटी (TET) पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. युवक काँग्रेसने सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान भाजपा-महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. टीईटी पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

‘सरकारला परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही’

युवक काँग्रेसने आरोप केला की, रविवारी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच शनिवारी ठाण्यात फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. यामुळे लाखो उमेदवारांचे नुकसान झाले असून राज्य सरकारला एकही स्पर्धा परीक्षा पारदर्शकपणे घेता येत नसल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, अलीकडील विविध स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढला असून सरकारने याप्रकरणी जबाबदारी स्वीकारावी.

दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी

आंदोलनादरम्यान शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी युवक काँग्रेसने केली. जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

याआधीही काँग्रेसची आक्रमक भूमिका

यापूर्वी काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ने सागर साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला होता. त्याआधी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरही आंदोलन करण्यात आले होते.

ऑपरेशन टायगर 3.0 ची मोठी शिकार! ‘सचिन अहिर यांनी आज षटकार मारला’; शिवसेना प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन छेडत काँग्रेसने टीईटी पेपरफुटीचा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरला असून, या प्रकरणावर सरकारची भूमिका आणि पुढील कारवाईकडे राज्यातील विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Congress youth congress protest over tet paper leak demands dada bhuse resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 08:45 PM

Topics:  

  • Congress
  • dada bhuse
  • Paper Leak Case
  • TET Exam
  • youth congress

संबंधित बातम्या

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण
1

MLC Election 2026 : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा पहिला उमेदवार ठरला; अदिती पोहरे यांचं राजकारणात पदार्पण

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
2

Washim: ज्ञानेश कुमार यांना अटक करा, वाशिम जिल्हा काँग्रेस आक्रमक; जिल्हाधिकरी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल
3

Bhiwandi : भिवंडी सामूहिक बलात्कार प्रकरणावरून काँग्रेस आक्रमक; ‘भाजपच्या महिला पदाधिकारी गप्प का?’ संध्या सव्वालाखेंचा सवाल

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
4

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.