Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women Reservation महिला आरक्षणावरून काँग्रेसची केंद्रावर टीका; ‘८५०’ आकड्याचा आधार काय?

लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण तातडीने लागू करावे, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे छाजेड यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारकडून '८५०' हा आकडा कोणत्या आधारावर मांडला जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 21, 2026 | 01:30 PM
Satara Congress News, Abhay Chhajed, Women’s Reservation Bill, Maharashtra Politics,

Satara Congress News, Abhay Chhajed, Women’s Reservation Bill, Maharashtra Politics,

Follow Us
Close
Follow Us:
  • महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
  • लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण लागू करावे- काँग्रेस
  • महागाई, आर्थिक अडचणी आणि इतर धोरणांचा परिणाम
Satara Congress News: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत अंमलबजावणीतील विलंब आणि आकडेवारीतील संदिग्धतेवर प्रश्न उपस्थित केले. माजी आमदार अभय छाजेड यांनी महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत भूमिका स्पष्ट करत, सरकारकडून पारदर्शकतेची मागणी केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुषमा राजेघोरपडे, राजेंद्र शेलार, रजनी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

छाजेड म्हणाले, “लोकसभेच्या विद्यमान ५४३ जागांमध्येच महिला आरक्षण लागू करावे, ही काँग्रेसची ठाम भूमिका आहे. मात्र ‘८५०’ हा आकडा नेमका कशाच्या आधारे पुढे आणला जात आहे, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे.”

Women Reservation Bill : “संसदेत असलेल्या लोकांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का? संजय राऊतांनी काढले सत्ताधारी नेत्यांचे

ते म्हणाले की, महिला आरक्षणासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा केला असून राहुल गांधी यांनीही यासाठी संघर्ष केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून संसदपर्यंत महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचा दावा त्यांनी केला.

२०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले असले, तरी त्याची अंमलबजावणी २०२९ नंतर करण्याचा प्रस्ताव असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी शंका व्यक्त केली. “जनगणना प्रक्रियेचा आधार देत अंमलबजावणी लांबणीवर टाकली जात आहे. ती वेळेत पूर्ण होईल का, याबाबत अनिश्चितता आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

US Iran Conflict : ‘इराण धमक्यांपुढे झुकणार नाही’; गालिबाफ यांचा शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांना मोठा इशारा

भाजप सरकारवर टीका करताना छाजेड यांनी महिलांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचा आरोप केला. “महागाई, आर्थिक अडचणी आणि इतर धोरणांचा परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. तसेच शेती आणि कामगार क्षेत्रातील निर्णयही घाईघाईने घेतले जात आहेत,” असे त्यांनी नमूद केले. काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, महिला आरक्षण हा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक न्यायाचा मुद्दा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 

 

Web Title: Congress targets center over womens reservation bill abhay chhajed demands transparency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Congress
  • Satara News

संबंधित बातम्या

साताऱ्यात गौणखनिज व्यवस्थापनात प्रशासनाची दमदार कामगिरी; महसूल १०० कोटींच्या लक्ष्याच्या उंबरठ्यावर
1

साताऱ्यात गौणखनिज व्यवस्थापनात प्रशासनाची दमदार कामगिरी; महसूल १०० कोटींच्या लक्ष्याच्या उंबरठ्यावर

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?
2

पुणे महापालिकेत भाजपाच्या नगरसेवकांची जोरदार घोषणाबाजी, काँग्रेस नगरसेवकांचेही प्रत्त्युत्तर; नेमकं काय घडलं?

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला
3

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला

Pimpri Chinchwad : ‘इंडिया’ आघाडीविरोधात महायुतीचे काळ्या फिती लावून आंदोलन; महापालिका प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी
4

Pimpri Chinchwad : ‘इंडिया’ आघाडीविरोधात महायुतीचे काळ्या फिती लावून आंदोलन; महापालिका प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.