Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला

साताऱ्यात शिवसेनेच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सज्जड इशारा दिला आहे. "हिशोब चोख ठेवतो" म्हणत त्यांनी जिल्हा परिषदेतील राजकारणावर भाष्य केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 20, 2026 | 09:59 PM
साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला

साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला

Follow Us
Follow Us:

 

  • “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”
  • साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला
सातारा, दि. २० (प्रतिनिधी): सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेले राजकारण हीन पातळीचे असून या यशवंत भूमीला ते कधीही मान्य होणार नाही, असा घणाघाती इशारा देत शिवसेनेचे प्रमुख तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “मी स्वभावाने रोखठोक आहे, हिशोब चोख ठेवतो. आडवे आले तर सोडत नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.

गांधी मैदानावर आयोजित शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराजे देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख शरद कणसे, हरिभाऊ जगदाळे, जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले, युवासेना अध्यक्ष संभाजी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

साताऱ्याचा गौरव करताना शिंदे म्हणाले, “ही यशवंत विचारांची भूमी आहे. यशवंतराव चव्हाणांसारखा दृष्टा नेता या मातीत जन्माला आला. परंपरा आणि विकासाचा संगम असलेल्या या जिल्ह्यात झालेले गलिच्छ राजकारण जनता विसरणार नाही.” जिल्हा परिषदेत घडलेल्या घटनांवर सध्या भाष्य टाळत असलो, तरी योग्य वेळी शिवसेनेचा ‘हिसका’ दाखवू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

कार्यकर्त्यांवर विश्वास व्यक्त करताना शिंदे म्हणाले, “शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कोणी मालक-नोकर नाही. कार्यकर्त्यांच्या कुवतीनुसार पदे दिली जातात. गाव तेथे शिवसेना ही मोहीम राबवा, मतदार यादीवर लक्ष ठेवा. तुमच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे.” सातारा जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Satara News : सामान्यांच्या घशाला कोरड अन् मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशाची कबुली देत, “बहुमत असूनही अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडता आले नाहीत, ही खंत आहे,” असे सांगितले. साताऱ्याला पर्यटन हब बनवण्यासाठी आराखडा तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांवर टीका करत, “खरी शिवसेना कोणती असा प्रश्न विचारणारे आता राजकारणातून हळूहळू संपत आहेत,” असा टोला लगावला. साताऱ्यात आयटी पार्क आणि फलटण येथे ग्रामीण एमआयडीसी प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. निलेश मोरे यांनी आपला राजीनामा मागे घेत शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दर्शवला. मेळाव्यामुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Maharashtra Politics: ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा

Web Title: Deputy chief minister eknath shinde launches a fierce attack on opponents in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politcs
  • Satara News
  • shivsena

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
1

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
2

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
3

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप
4

सातारा शहरातील ५८ मंडळांच्या गणरायांचे विसर्जन; जिल्ह्यात ५३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी घेतला निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.