खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधून महिला आरक्षण विधेयकावरुन विरोधकांवर हल्लाबोल केला (फोटो- सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस स्वत: वकील आहेत ना? मग त्यांनी एकदा नीट वाचावे. संसदेत असलेल्या लोकांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का? हे संसदेत बसलेल्या लोकांची अक्कल काढत आहेत. त्यामध्ये त्यांचेही खासदार आहेत. मुख्यमंत्री किती खोटं बोलणार आहेत. फडणवीसांनी त्यांची स्तर सांगावी, कोणती स्तर आहे. भाजपाची कोणती लेव्हल आहे ती सांगावी. कोणतेही विधेयक पाडण्यात आले नाही, ज्याचा संबंध महिला आरक्षणासंदर्भात आहे,” अशी घणाघाती टीका खासदार राऊतांनी केली.
हे देखील वाचा : “दादा खरंच गेलाय का…? तो शेवटचा फोन अन् भेट; MP सुप्रिया सुळेंनी मांडल्या भावना
मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता आपल्याकडे राहावी म्हणून….
पुढे ते म्हणाले की, “भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला त्यांना प्रधानमंत्रिपदावरून मोदींना जाण्याचे वेद लागले आहेत, त्या गटाला. त्या गटात देवेंद्र फडणवीस आहेत का हे मला माहिती नाही. मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता आपल्याकडे राहावी, याकरिता हे बिल आणण्यात आलं. हा फक्त आमचा आरोप नसून हे सत्य आहे. तुम्हाला महिलांना आरक्षण देण्यास कोणीही रोखल नाही,” अशी आक्रमक भूमिका खासदार संजय राऊतांनी घेतली.
हे देखील वाचा : “सरड्यासारखा रंग बदलत विरोधकांनी विधेयकाला नामंजूर केलं”, देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर टीका
पण या बिलाचे सुत्रधार अमित शाह…
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, “नरेंद्र मोदी यांनी मनात आणले असते तर हे विधेयक ते मंजूर करून घेऊ शकले असते. नरेंद्र मोदी यांची इच्छा असती तर त्यांनी हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी स्वत: चर्चा केली असती आणि मन वळवली असती, त्यापूर्वी त्यांनी ते केले. पण या बिलाचे सुत्रधार अमित शाह होते,’ असेही संजय राऊत यांनी म्हटले. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले.






