Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उमेदवारी माघारी घेतली तरी काँग्रेस भूमिकेवर ठाम, 2029 ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल; हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास

आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 09, 2026 | 04:52 PM
उमेदवारी माघारी घेतली तरी काँग्रेस भूमिकेवर ठाम, 2029 ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल; हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास

उमेदवारी माघारी घेतली तरी काँग्रेस भूमिकेवर ठाम, 2029 ला बारामतीत काँग्रेसचा आमदार असेल; हर्षवर्धन सपकाळांचा विश्वास

Follow Us
Follow Us:

मुंबई : बारामतीची पोटनिवडणूक लढली पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती, काँग्रेसचे हे वैचारिक पाऊल योग्यच आहे, कुठेही थांबता कामा नये ही भूमिका आहे. पण याबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, समंजस्यपणा, सभ्यता याची एक किनारही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटातील नेत्यांनी संवाद साधून उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची विनंती केली होती, त्यानंतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांशी व पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून बारामतीतून काँग्रेसची उमेदवारी माघारी घेत आहोत, आज दोन पावले मागे येऊन माघार घेतली असली तरी २०२९ च्या निवडणुकीत बारामतीतून काँग्रेसचा आमदार असेल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

 

गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, दिवंगत अजित पवार यांचे काँग्रेस पक्षाशी अनेक वर्ष संबंध होते, हे संबंध लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाने उमेदवारी मागे घ्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली. तसेच त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीही फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद आबा पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे, संजय खोडके, सना मलिक, राजेश विटेकर यांच्या शिष्टमंडळाने आज गांधी भवनला येऊन भेट घेत उमेदवार मागे घेण्याची विनंती केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (श.प.) आमदार रोहित पवार यांनीही सकाळी भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही फोन केला होता. शरद पवार साहेबांनीही भावना व्यक्त केल्या होत्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याशीही फोन करून संवाद साधला, त्यांच्या विनंतीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षप्रभारी रमेश चेन्नीथला व राज्यातील काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून बारामतीतून उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बारामतीतून काँग्रेस पक्षाने उमेदावारी मागे घेतली असली तरी अजित पवार यांच्या निधनाची चौकशी व्हावी या भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम आहे. तसेच भाजपासारख्या विषारी व विखारी पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेसाठी केलेली आघाडी न पटणारी व न रुजनारी आहे, त्याला आजही काँग्रेसचा विरोध कायम आहे, असे सपकाळ म्हणाले.

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला होता आणि बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती त्यांनी केली होती, यावेळी त्यांनी महाराष्ट्र संस्कृती हा शब्दही वापरला पण त्यांचा फोन व उमेदवारी माघारी घेणे याचा काहीही संबंध नाही. भाजपाला काँग्रेस पक्षाचा विरोध आहे व तो कायम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिवंगत अजित पवार यांच्या अपघातावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल तसेच काँग्रेसशासित कर्नाटक सरकारने यासंदर्भात एफआयआर नोंदवून घेतल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) आमदार रोहित पवार यांनी आभार मानले. तसेच काँग्रेस पक्षाबद्दल पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाबद्द्दल दिलगिरी व्यक्त केली. पार्थ पवार यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन केलेले नाही. त्यांचे विधान अत्यंत चुकीचे, अनावश्यक व अपरिपक्व असल्याने त्याला जास्त महत्व देण्याची गरज नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार अॅड. आकाश मोरे यांच्यासह इतर चार इच्छुक उमेदवार व बारामतीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या व त्यानंतर निर्णय जाहीर केला.

हे सुद्धा वाचा : राजकारणात आली नवी रंगत! विधान परिषदेच्या रिंगणात ‘मोठ्या चेहऱ्यांची’ प्रतिष्ठा पणाला

Web Title: Congress withdraws nomination from baramati assembly by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:51 PM

Topics:  

  • Baramati by-election
  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
1

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
3

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला
4

‘म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला फसवणीस नाव दिले’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.