Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: सिटी पार्कच्या वापराबाबत पुन्हा वाद! नागरिकांसाठीच्या उद्यानाचा बांधकाम साहित्य साठवणुकीसाठी केला जातोय वापर

वांद्रे पूर्व परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील मोजक्या मोठ्या मोकळ्या आणि हिरव्या जागांपैकी एक असलेल्या या उद्यानातील नागरिकांचा प्रवेश आधीच मर्यादित होता.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 13, 2026 | 08:56 AM
सिटी पार्कच्या वापराबाबत पुन्हा वाद! नागरिकांसाठीच्या उद्यानाचा बांधकाम साहित्य साठवणुकीसाठी केला जातोय वापर

सिटी पार्कच्या वापराबाबत पुन्हा वाद! नागरिकांसाठीच्या उद्यानाचा बांधकाम साहित्य साठवणुकीसाठी केला जातोय वापर

Follow Us
Follow Us:

वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) नागरिकांसाठी विकसित करण्यात आलेल्या सिटी पार्कच्या वापराबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. करदात्यांच्या पैशातून विकसित करण्यात आलेल्या या सार्वजनिक उद्यानाचा मोठा भाग सध्या बॅरिके लावून बंद करण्यात आला असून या जागेचा आगामी पॉड टॅक्सी प्रकल्पाशी संबंधित बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वांद्रे पूर्व परिसरातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील मोजक्या मोठ्या मोकळ्या आणि हिरव्या जागांपैकी एक असलेल्या या उद्यानातील नागरिकांचा प्रवेश आधीच मर्यादित होता.(फोटो सौजन्य – AI)

मोठी बातमी ! राज्यातील 1.80 कोटी मतदारांची नावे वगळणार? अनेकांची नावे अद्याप डिजिटलाईज नाही

आता संपूर्ण मोकळ्या मैदानाभोवती बॅरिकेड्स उभारल्याने नागरिकांसाठी उपलब्ध असलेली सार्वजनिक जागा आणखी कमी झाली आहे.या उद्यानाचा काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद असून, तो एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव आहे.विशेषतः एमएमआरडीए अधिकाऱ्याऱ्यांच्या जेतवन वसाहतीलगतचा भाग तुलनेने अधिक चांगल्या प्रकारे राखला जात असताना उद्यानाच्या उर्वरित भागाकडे मात्र दुर्लक्ष झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

एमके मार्ग अॅडव्हान्स्ड लोकॅलिटी मॅनेजमेंटचे सहसचिव पराग रिसबूड यांनी सांगितले की, सिटी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरी बांधकाम सुरू असून संपूर्ण मोकळे मैदान पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कामासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हे सार्वजनिक उद्यान आणि हरित क्षेत्राचा गैरवापर करण्यासारखे आहे. नागरिकांसाठी असलेल्या या हिरवळीचे रूपांतर एमएमआरडीएकडून काँक्रीटच्या बांधकामस्थळात केले जात आहे, असा आरोप रिसबूड यांनी केला. नागरिकांनी वारंवार हे मनोरंजनाचे मैदान सर्वांसाठी खुले ठेवण्याची मागणी केली आहे.

Mumbai- Pune मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट! कनेक्टिंग लिंक 3 तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

कोविडपूर्व काळात सिटी पार्क हे बीकेसी परिसरातील नागरिक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे सार्वजनिक ठिकाण होते. येथे खाद्यपदार्थांचे स्टॉल, अॅम्फी थिएटर तसेच सायकलस्वार, स्ट्रीट परफॉर्मर्स आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी जागा उपलब्ध होती. मात्र, त्यानंतर उद्यानाची देखभाल आणि सार्वजनिक वापर हळूहळू कमी होत गेला. दरम्यान, नागरिकांना सार्वजनिक जागेपासून दूर ठेवून त्याच जागेचा प्रकल्पासाठी वापर केला जात असल्याबद्दल स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी आवश्यक बांधकाम सुविधा उभारण्यासाठी पर्यायी जागेचा वापर करता आला असता का? तसेच सार्वजनिक उद्यानाचा वापर करण्यास कोणती परवानगी देण्यात आली आहे? याबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Controversy erupts again over the use of city park the park intended for citizens is being used to store construction materials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • BKC ground
  • maharashtra
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.