Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेची तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या पोलिसांना न्यायालयाचा दणका; हडपसर पोलीस निरीक्षकांना बजावली नोटीस

महिला सुरक्षा व महिलांच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई यालाच पुणे पोलीसांचे पहिले प्राधान्य असेल, असे वरिष्ठ अधिकारी बोलून दाखवत असले तरी हडपसर पोलीस मात्र त्याला अपवाद ठरले आहे. धक्कादायक म्हणजे, पिडीतेचा गुन्हा दाखल न केल्याने तिने न्यायालयात दाद मागितली.

  • By Aparna
Updated On: Oct 20, 2022 | 01:49 PM
महिलेची तक्रार घेण्यास नकार देणाऱ्या पोलिसांना न्यायालयाचा दणका; हडपसर पोलीस निरीक्षकांना बजावली नोटीस
Follow Us
Follow Us:

पुणे : महिला सुरक्षा व महिलांच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई यालाच पुणे पोलीसांचे पहिले प्राधान्य असेल, असे वरिष्ठ अधिकारी बोलून दाखवत असले तरी हडपसर पोलीस मात्र त्याला अपवाद ठरले आहे. धक्कादायक म्हणजे, पिडीतेचा गुन्हा दाखल न केल्याने तिने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले. तरीही हडपसर पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आता न्यायालयाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना कारणे दाखवाची नोटस बजावत दणका दिला आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ‌ उडाली आहे.

याप्रकरणातील पिडीत महिलेने विशाल सुरज सोनकर (रा. वानवडी गाव) याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अॅड. साजिद शाह यांच्याद्वारे अर्ज केला होता. तक्रारीत तिला लग्नाचे आमिष दाखवून संशयीत आरोपीने बलात्कार व अनैसर्गिक कृत्य तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्याने तिचे नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी व ते फोटो नातेवाईकांना पाठविल्याचे म्हटले आहे. त्यानुसार लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. जे. पाटील यांनी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानंतर तक्रारदार महिला हडपसर पोलिस ठाण्यात गेली. न्यायालयाचा आदेशाची प्रत पोलिसांना दिली व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण, हडपसर पोलिसांनी गुन्हाच दाखल करून घेतला नाही. न्यायालयाने १५६ (३) च्या अर्जावर (दि. ६) ऑक्टोबर) आदेश दिले होते. पण, अनेक दिवसानंतरही गुन्हा नोंद केला आहे. न्यायालयाचे आदेश असताना देखील गुन्हा दाखल न केल्याने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात अ‍ॅड. शाह यांनी पुन्हा न्यायालयाकडे तक्रार अर्ज केला. याप्रकरणी न्यायालयाने आता हडपसर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

[blockquote content=”माझ्या आशीलावर लैगिंक अत्याचार झाल्यानंतर तीची पोलिस ठाण्यात तक्रार घेतली नाही. आम्ही न्यायालयात 156 (3) नुसार अर्ज करून याप्रकरणात बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, अपहार, फसवणूक यांसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पण, तरीही अशीलाचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यावर आम्ही कन्टेम्प्ट ऑफ कोर्टसाठी अर्ज दाखल केला. त्यावर लष्कर न्यायालयाने हडपसर पोलिस निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ” pic=”” name=”- अ‍ॅड. साजिद शाह, तक्रारदार महिलेचे वकील.”]

वर्षपूर्तीचे जंगी सेलिब्रेशन…
हडपसर पोलीस ठाणे शहरातील अतिमहत्वाच्या पोलीस ठाण्यापैंकी एक आहे. सार्वत्रिक विचार केल्यानंतर त्यासाठी या पोलीस ठाण्याचा पदभार मिळविण्यासाठी वाट्टेल ते केले जाते. पण, तेथील कारभार सांभाळन अन् हद्दीत शांतता कायम राखन तितक सोपही नसत. गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे तेथील निरीक्षक वर्षाच्या आतच बदललेले गेले. पण, सध्याचे निरीक्षक वर्षभर टिकले. त्याचा आनंद आपसूकच त्यांना व्हायला हवा. पण, आनंदाच सेलिब्रेशनात झाल अन् कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू भागातून हडपसर सारख्या मायानगरीच राज्य सांभाळणाऱ्या शाहीन त्याचा मोठ सेलिब्रेशनकरून कौतुकांचा वर्षाव केला. त्यामुळे वरिष्ठ भारावून गेलेच पण, ज्यांनी आयोजन केल त्यांचाही स्वप्न पुर्ण झाल. वर्षपुर्तीला पंचतारांकितीचे रूप आणल होत, अशी हडपसर वासियांमध्ये चर्चा आहे. पण, हद्दीतील वाढत्या गुन्हेगाराला लगाम लावण्यात यशस्वी नसल्याची खंतही रहिवाशी बोलून दाखवतात.

Web Title: Court slams police for refusing to take womans complaint notice issued for contempt nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2022 | 01:44 PM

Topics:  

  • Contempt Of Court
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
2

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
3

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग
4

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.