Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक परिसरात दोन इर्टिका कारची समोरासमोर भीषण धडक होऊन सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावरील धोकादायक वळण आणि टेकडीमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 12, 2026 | 05:09 PM
म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावर दोन इर्टिका कारची समोरासमोर भीषण धडक
  • सहा जण जखमी
  • दोन्ही वाहनांचा चक्काचूर
Mhaswad Accident News : माण तालुक्यातील म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक (राजेमाने यांचा मळा) येथे रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दोन इर्टिका कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कारमधील सहा प्रवासी जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त इर्टिका कारपैकी एक कार वरकुटे–म्हसवड येथील बनवस्तीवरील, तर दुसरी कार पिलीव, ता. माळशिरस येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातात वरकुटे येथील बनवस्तीवरील महेश तानाजी चव्हाण (वय २८), त्यांची आई सुनंदा तानाजी चव्हाण (वय ४७), पत्नी सायली महेश चव्हाण (वय २४) आणि गौरी दादा जाधव (वय २२) हे जखमी झाले आहेत. तर पिलीव येथील कारमधील समाधान खरात हेही जखमी झाले असून सहाव्या जखमी व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. अपघातग्रस्त वाहनांचे क्रमांक MH 45 AZ 4052 आणि MH 04 LY 5388 असे आहेत.

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

विशेष म्हणजे, म्हसवड–शिंगणापूर रस्त्यावरील भवानी टेक परिसरात असलेले छोटे वळण आणि टेकडी यामुळे समोरून येणारे वाहन वेळेत दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या सदोष रचनेमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी म्हसवड–मायणी रस्त्यावरील वडजल येथेही अशाच प्रकारचा अपघात घडला होता. त्यामुळे या धोकादायक ठिकाणांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

अपघातानंतर तरी प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित होत असून भवानी टेक येथील धोकादायक वळणावर सूचना फलक, वेगमर्यादा फलक आणि आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे. भविष्यात मोठी जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Maharashtra FDA Raid : अस्वच्छता आणि नियमभंग भोवला; मुंबईतील दहा आस्थापनांचे परवाने निलंबित

Web Title: Mhaswad shingnapur road accident two ertiga cars head on collision six injured bhavani tek sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 05:09 PM

Topics:  

  • Accident
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त
2

Gondiya News: गोंदियात ६२१ सर्वजनिक दुर्गामूर्तीची स्थापना! गरबा-दांडियाचा उत्साह; नवरात्रोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग
3

Amravati News: कंत्राटदारामुळे स्वच्छता व्यवस्था कोलमडली! कचरा संकलन ठप्प; नागरिकांच्या घरांपुढे कचऱ्याचे ढीग

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?
4

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.