Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समृद्धीवर ‘ब्रेकडाउन’ वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा

समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने आढळल्यास ती तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2026 | 11:00 AM
समृद्धीवर 'ब्रेकडाउन' वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा

समृद्धीवर 'ब्रेकडाउन' वाहनांना लगाम! अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई; आरटीओचा इशारा

Follow Us
Follow Us:

समृद्धी महामार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर रस्त्यात उभे असलेले वाहन म्हणजे मोठ्या अपघाताला निमंत्रणच ! त्यामुळे महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध परिवहन विभागाने आता कठोर कारवाईची भूमिका घेतली. वाहन बंद पडल्यास अथवा कोणत्याही कारणास्तव थांबावे लागल्यास वाहन तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. समृद्धी महामार्गाच्या नोडल अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी वाहनधारक आणि वाहनचालकांना याबाबत विशेष सूचना दिल्या आहेत. महामार्गावर वाहनांचा वेग मोठा असल्याने मुख्य मार्गावर किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी वाहन उभे करणे अत्यंत धोकादायक आहे. अशा वाहनांमुळे मागून येणाऱ्या वाहनांना वेळेत अंदाज न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

बोगस बियाणेप्रकरणी एसआयटी गठित! शेतकऱ्यांच्या न्यायासाठी निर्णायक पाऊल; नुकसानीची होणार आता सखोल चौकशी

बिघाड झाला तरी रस्त्यातच थांबू नका’:

समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि अपघातमुक्त ठेवण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने आढळल्यास ती तात्काळ सुरक्षितस्थळी हलविण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. वाहनात बिघाड झाल्यास चालकांनी शक्य तितक्या लवकर वाहन सुरक्षितस्थळी हलवावे आणि संबंधित यंत्रणेला त्याची माहिती द्यावी, असे परिवहन विभागाने स्पष्ट केले असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे:

पालनः रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक ०९/२०२५ मध्ये १३ एप्रिल २०२५ च्या अंतरिम निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांच्या अनुषंगाने सार्वजनिक रस्ते आणि महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. समृद्धी महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल”, असा इशारा समृद्धी महामार्गाच्या नोडल अधिकारी तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला.

नदी पोखरणारे रेतीमाफिया आता रडारवर! रॉयल्टीच्या दहापट दंडाची कारवाई; अवैध उत्खननाला शासनाचा दणका

वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर याच प्रकारची घटना समोर आली. रविवारी एचआर / ५५ बीए ८५४४ क्रमांकाच्या कंटेनरचालकाने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये वाहन उभे करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये नागपूरहून पुण्याला नेण्यात येणारा माल असल्याचे आढळून आले. वाहन राष्ट्रीय महामार्गाच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत असल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच चालकाविरुद्ध सावंगी, जिल्हा वर्धा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Crackdown on broken down vehicles on the samruddhi expressway action to be taken against vehicles causing obstructions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Accident
  • yavatmal news

संबंधित बातम्या

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
1

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
2

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
4

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.