Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus: एसटीच्या ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद, आठवड्यात १ लाखाचा टप्पा पार

महाराष्ट्र सरकार त्यांच्या रोडवेज बसेसमध्ये नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सिस्टम लागू करण्यात आली. सरकारने बस तिकिटांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला असून या नोंदणीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 28, 2026 | 05:13 PM
एसटीच्या ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद, आठवड्यात १ लाखाचा टप्पा पार

एसटीच्या ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद, आठवड्यात १ लाखाचा टप्पा पार

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने पाऊल टाकत ‘एनसीएमसी स्मार्ट कार्ड’ उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

केवळ एका आठवड्याभरात या उपक्रमांतर्गत एकूण 1,00,021 प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यात ‘महिला सन्मान योजना’ लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून डिजिटल प्रवासाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे. तसेच इतर ज्येष्ठ नागरिक 24,927 आणि इतर प्रवासी 2,219 अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून, प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत, डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याचे या नोंदणीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपची…; हर्षवर्धन सपकाळांची टीका

एनसीएमसी स्मार्ट कार्डची सक्ती नाही

1 मार्चपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमांवर पसरली होती. तथापि, जोपर्यंत 80% सवलत धारक प्रवाशांची स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खासगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी , असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे.

भविष्यात एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी अधिक सुलभ होणार असून, भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एसटी महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून, प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

कार्डवर एवढी रक्कम राखणे आवश्यक

कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक आहे आणि ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येते. ईटीआयएम मशीन, वेबसाइट, मोबाईल अॅप किंवा अधिकृत एजंटद्वारे रिचार्ज करता येते. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३,००० हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण प्रवाशांना बसस्थानकावर नोंदणीच्या सुविधेचाही फायदा होईल. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या या उपक्रमामुळे प्रवास सोपा आणि सुरक्षित होईल.

‘लाडक्या बहिणी’मुळे अन्य खात्यांवर येतोय आर्थिक ताण; आता योजना बंद होणार का? मंत्री नाईक म्हणाले…

Web Title: Crosses 1 lakh mark in a week spontaneous response to st bus ncmc smart card registration said pratap sarnaik news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Marathi Language: मराठीचा इंगा! रिक्षा-टॅक्सीचालकांनो व्हा सावध, मराठी भाषा येत नाही तर परवानाही होणार रद्द
1

Marathi Language: मराठीचा इंगा! रिक्षा-टॅक्सीचालकांनो व्हा सावध, मराठी भाषा येत नाही तर परवानाही होणार रद्द

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी
2

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

Pratap Sarnaik : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik : शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मोठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी Metro चे नेटवर्क जोडले जाणार; प्रताप सरनाईक काय म्हणाले?
4

मोठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी Metro चे नेटवर्क जोडले जाणार; प्रताप सरनाईक काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.