Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मेट्रोच्या नागरी अभियांत्रिकी पथकाने शनिवार आणि रविवार अशा सलग दोन रात्री अखंड काम केले. अखेर सोमवारी (दि.२९) पहाटे या पुलाची दोन्ही टोके मेट्रो स्थानकाच्या संरचनेशी यशस्वीपणे जोडण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 30, 2026 | 02:58 PM
पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुण्यातील अत्यंत वर्दळीचा आणि अपघातांचा धोका असलेला मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड चौक आता पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित बनला आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ‘पुणेरी मेट्रो’च्या वाकड स्थानकावर ६० मीटर लांबीचा भव्य पादचारी पूल (फूट ओव्हर ब्रिज) यशस्वीरीत्या उभारला आहे. विशेष म्हणजे, केवळ मेट्रो प्रवासीच नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांनाही रस्ता ओलांडण्यासाठी या पुलाचा वापर करता येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून वाकड चौकातून महामार्ग ओलांडणे म्हणजे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत होते. या पार्श्वभूमीवर, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ अधिक सक्षम करण्यासाठी उचललेले हे पाऊल मैलाचा दगड ठरणार आहे. वाकड चौक हा पश्चिम पुण्याचे प्रमुख प्रवेशद्वार असून, येथे २४ तास वाहनांची प्रचंड वर्दळ असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी पुलाची उभारणी करणे अभियंत्यांसाठी मोठे तांत्रिक आव्हान होते.

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश पूर्णतः रद्द करा; रोहन सुरवसे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी मेट्रोच्या नागरी अभियांत्रिकी पथकाने शनिवार आणि रविवार अशा सलग दोन रात्री अखंड काम केले. अखेर सोमवारी (दि.२९) पहाटे या पुलाची दोन्ही टोके मेट्रो स्थानकाच्या संरचनेशी यशस्वीपणे जोडण्यात आली.

वाकड चौक बनणार ‘एकात्मिक वाहतूक केंद्र’

मुंबई, बंगळुरू, नागपूर आणि चेन्नई यांसारख्या शहरांतून पुण्यात येणाऱ्या किंवा येथून बाहेर जाणाऱ्या शेकडो शासकीय आणि खासगी बसेस, शेअर्ड कॅब्ससाठी वाकड चौक हा मुख्य ‘पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट’ आहे. दररोज येथे हजारो प्रवाशांची ये-जा असते. नव्याने उभारण्यात आलेला हा पादचारी पूल आता थेट मेट्रो स्थानकाला महामार्गाच्या दुसऱ्या बाजूशी जोडत असल्याने, बाहेरील शहरांतून येणारे प्रवासी थेट सुरक्षितपणे मेट्रोचा प्रवास करू शकतील. परिणामी, वाकड चौक आता एक आधुनिक ‘एकात्मिक वाहतूक केंद्र’ म्हणून विकसित होत आहे.

वाकड मेट्रो स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

हिंजवडी ते जिल्हा न्यायालय या २३.३ किलोमीटर लांबीच्या ‘पुणे मेट्रो लाइन ३’ (पुणेरी मेट्रो) मार्गावरील वाकड स्थानक हे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वाधिक गर्दीचे स्थानक असणार आहे. स्थानकाची बहुतांश नागरी कामे पूर्ण झाली असून, फिनिशिंग आणि दिशादर्शक फलक (सायनेज) बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

अंतिम वैधानिक मंजुरीची प्रतिक्षा

हे स्थानक शहर बस सेवा, फीडर सेवा, खासगी वाहने आणि पादचारी सुविधांशी जोडले जाणार आहे. प्रवासाचा वेळ ५०% वाचणार आहे. पुणेरी मेट्रोने संपूर्ण २३ किलोमीटरच्या उन्नत मार्गावर आपली यशस्वी ‘एंड-टू-एंड’ चाचणी पूर्ण केली असून, आता केवळ अंतिम वैधानिक आणि नियामक मंजुरीची प्रतीक्षा आहे.

Web Title: Crossing road at pune wakad chowk will now be possible the metro is set to build a 60 meter pedestrian bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • PCMC News
  • Pimpri News
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना
1

पुण्यात भरधाव कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; पाषाण-बावधन रस्त्यावरील धक्कादायक घटना

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार
2

पुण्यात ‘ग्लोबल स्कॉलर्स’चा एकलव्य इंडिया फाऊंडेशनकडून सत्कार; तब्बल 25 विद्यार्थी परदेशात शिक्षण घेणार

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
3

संतोष पंडितवर गुन्हा, मग आमदार गायकवाडांवर का नाही? कोथरूड पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
4

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.