संग्रहित फोटो
नाशिक : नाशिक लोकसभेच्या (Nashik Lok Sabha) जागेवरून भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चांगलीच रस्सीखेच रंगली होती. छगन भुजबळ यांनी आपल्याला दिल्लीतून उमेदवारी मिळाल्याचे सांगितल्यानंतर शिवसेना नेत्यांचा तिळपापड झाला होता. तेव्हापासून भुजबळ आणि शिवसेना नेत्यांत शाब्दिक जुगलबंद रंगली होती.
महायुतीच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी (दि. २) जात असताना मात्र या दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास केल्याने यांच्यातील वाद संपुष्टात आल्याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात रंगली होती. नाशिकमधून आपली उमेदवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी फायनल केल्याचा बॉम्ब टाकून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासूनच शिवसेना नेते आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक चर्चा झडत राहिल्या.
शिवसेनेने हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना मात्र या दोघांनीही एकाच वाहनातून प्रवास केल्याने किमान त्या वेळेपुरते का असेना या दोन्ही नेत्यांमध्ये समझोता दिसून आले.